दिनविशेष १६ डिसेंबर

दिनविशेष

दि. १६ डिसेंबर

* विजय दिवस, बांग्लादेशचा स्वातंत्र्यदिन

* (१९७१) बांगला मुक्ती वाहिनीला मदत करतांना भारताने १६ डिसेंबर, इ.स. १९७१ रोजी पाकिस्तान बरोबरील युद्धात विजय मिळवला होता. भारतात हा दिवस 'विजय दिवस' म्हणून साजरा केला जातो. हे युद्ध ३ डिसेंबर, इ.स. १९७१ ला सुरू होऊन १६ डिसेंबर, इ.स. १९७१ ला संपले. इंदिरा गांधी व लष्करप्रमुख जनरल माणेकशॉ यांनी या युद्धात महत्वाची भूमिका बजावली होती


१. (१६८७) लढवय्ये, पराक्रमी, छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांचे निधन

प्रतापराव गुजरांच्या मृत्यूनंतर सरसेनापतीपदी त्यांची नेमणूक इ.स. १६७४ साली झाली

२. (२०००) सुमारे ४० वर्षे नवनवे चित्तथरारक खेळ व कसरती सादर करुन परदेशातही वाहवा मिळवलेले सर्कस सम्राट काशिनाथ सखाराम तथा बंडोपंत देवल यांचे निधन

बंडोपंत देवल एकट्याच्या जोरावर देवल सर्कस रंजक करायचे. याला कारण असं त्यांनी रंगवलेला विदुषक. बंडोपंत असा फर्मास विदुषक उभा करायचे, की त्यांचा विदुषक पाहायला देवल सर्कस मध्ये गर्दी व्हायची. वयाच्या ११ व्या वर्षापासून बंडोपंत सर्कशीत काम करत होते. त्यांचे काका बाबासाहेब देवल यांच्यापासून त्यांना या कलेतल्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी कळून आल्या

३. (२००४) मी आलो, मी पाहिलं, मी लढलो आणि मी जिंकून घेतलं सारं... असं म्हणणारे सुप्रसिद्ध मराठी नाट्य आणि चित्रपट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचे निधन

बेर्डे यांनी मराठी साहित्य संघ या प्रोडक्शन कंपनीत कर्मचारी म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली आणि त्यानंतर काही मराठी रंगमंच नाटकांत त्यांनी भूमिका साकारल्या. मराठी चित्रपटांशिवाय त्यांचे शांतेचा कर्ता चालु आहे, बिघाडले स्वर्गगाच द्वार यासारखे विनोदी रंगमंच नाटकही यशस्वी ठरले. बर्डेंनी बॉलिवूडमधील बऱ्याच चित्रपटांमध्ये काम केले आणि कॉमिक रोलमधील सर्वोत्कृष्ट कामगिरीसाठी फिल्मफेर पुरस्कारासाठी चार नामांकने मिळाली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर