दिनविशेष १५ डिसेंबर
दिनविशेष
दि. १५ डिसेंबर
* जागतिक चहा दिन
आंतरराष्ट्रीय संघटनांच्या बैठकीत १५ डिसेंबर हा आंतरराष्ट्रीय चहा दिन म्हणून साजरा करायचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर २००५ सालापासून १५ डिसेंबरला पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा करण्यात आला
चहाचा व्यापार आणि चहाच्या मळ्यात काम करणाऱ्या कामगारांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जगभर आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो
चहा जगातील सर्वाधिक सेवन केल्या जाण्याऱ्या पदार्थापैकी एक आहे. त्यामुळेच प्रत्येकाची चहा बनवण्याची पद्धत वेगळी असते. कुणाला आलं घालून चहा प्यायला आवडतं तर कुणाला ब्लॅक टी प्यायला आवडते
भारतात दार्जिलिंग, आसाम, पश्चिम बंगाल, तामिळनाडू आणि केरळमध्ये प्रामुख्याने चहाची लागवड केली जाते. तसेच भारतीय चहाला जगभरातून मागणी आहे
१. (१७४९) राजधानी सातारचे जनक छत्रपती शाहू महाराज यांचे निधन
साताऱ्याला थोरल्या शाहूंनी इ.स. १७०७ पासून ते १५ डिसेंबर इ.स.१७४९ पर्यंत राज्य चालविले
२. (१९०५) साहित्य अकादमी व महाराष्ट्र शासन पुरस्कार विजेत्या मानववंशशास्त्रज्ञ, समाजशास्त्रज्ञ व शिक्षणतज्ञ इरावती कर्वे साहित्य यांचा जन्म
मानववंशशास्त्र, समाजशास्त्र आणि मानसशास्त्राच्या अभ्यासक असलेल्या इरावती कर्व्यांनी वैचारिक ग्रंथांबरोबर ललित लेखन देखील केले आहे. भारतीय त्याचप्रमाणे मराठी संस्कृती हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय होता. या विषयांवर त्यांनी मराठी तसेच इंग्रजीतून लिखाण केले आहे. उच्चशिक्षित, निरीश्वरवादी, बुद्धिप्रामाण्यवादी असलेल्या इरावती कर्वे यांचे संस्कृत भाषेवर देखील प्रभुत्व होते. आधुनिक विचारांच्या असूनही आपल्या संस्कृतीबद्दल असलेली आपलेपणाची व आपुलकीची दृष्टी त्यांच्या लिखाणातून दिसून येते
३. (१९३२) प्रामाणिक व कर्तव्यदक्ष निवडणूक अधिकारी टी. एन. शेषन यांचा जन्म
ज्यांच्यामुळे देशाला 'निवडणूक आयोग' नावाची 'संस्था' समजली, असे माजी मुख्य निवडणूक आयुक्त टी. एन. शेषन हे १९९० ते १९९६ या काळात भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त होते. त्यांनी भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील अनेक गैरमार्ग व दोष दूर केले. शेषन यांना सन १९९६ मध्ये उत्कृष्ट शासकीय सेवेसाठीचा रॅमन मॅगसेसे पुरस्कार मिळाला
४. (१९५०) स्वतंत्र भारताचे पहिले उपपंतप्रधान व पहिले गृहमंत्री, भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचे निधन
वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment