दिनविशेष १२ डिसेंबर
दिनविशेष
दि. १२ डिसेंबर
१. (१९०५) प्रसिद्ध लेखक डॉ. मुल्कराज आनंद यांचा जन्म
त्यांची सुप्रसिद्ध कादंबरी 'अनटचेबल' ही १९३५ साली प्रकाशित झाली. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत मुल्कराज यांनी भाग घेतलाच परंतु आपली लेखणीही चालवली
२. (१९११) दिल्ली ही भारताची राजधानी करण्यात आली. या आधी कोलकाता ही भारताची राजधानी होती
३. (१९३०) परदेशी मालाविरुद्ध निदर्शने करताना हुतात्मा बाबू गेनू यांचा मोटारीखाली मृत्यू
ते एक भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेले स्वातंत्र्यसैनिक होते. ब्रिटिश मालावरील बहिष्काराच्या चळवळीत महाराष्ट्रातल्या मुंबई शहरात ब्रिटिश माल वाहून नेणाऱ्या ट्रकाला रोखण्यासाठी ते रस्त्यावर आडवे पडले. १२ डिसेंबर १९३० ला अंगावरून ट्रक गेल्याने त्यांचा मृत्यू झाला
४. (१९४०) महाराष्ट्रातील जेष्ठ नेते, माजी केंद्रीय संरक्षणमंत्री, कृषीमंत्री आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री शरद पवार यांचा जन्म
५. (१९६४) हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचे निधन
ते एक हिंदी कवी होते. हिंदी साहित्याच्या इतिहासातील खडीबोलीतील ते पहिले महत्त्वाचे कवी आहेत. साहित्यविश्वात त्यांना 'दादा' या नावाने संबोधले जायचे. त्यांचे भारत-भारती (१९१२) हे काम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान खूप प्रभावी ठरले आणि म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना 'राष्ट्रीय कवी' ही पदवी दिली. त्यांची जयंती दरवर्षी ३ ऑगस्ट हा दिवस 'कवी दिन' म्हणून साजरा केला जातो. त्यांचे सुमारे ४० स्वतंत्र ग्रंथ आणि ६ अनुवादित ग्रंथ प्रसिद्ध झाले
६. (२०१५) शेतकरी नेते शरद जोशी यांचे निधन
ते महाराष्ट्रातील शेतकरी चळवळीतील महत्त्वाचे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या इच्छापत्रात त्यांनी शेतकऱ्याच्या हिताचा विचार केला आणि एका कारखान्याच्या बुडीत सभासदांचे पैसे अदा केले
तिसऱ्या जगातील आर्थिक दुरवस्थेचे अचूक निदान करून त्यावर उपचार सुचविणारा विचार म्हणून शरद जोशींचा विचार व त्याच्या मान्यतेसाठी त्यांनी सुरू केलेल्या शेतकरी चळवळीचा अभ्यास करण्यासाठी, अनेक विदेशी विद्यापीठांतील संशोधकांनी भारतात धाव घेतली. त्यांना शरद जोशींनी मार्गदर्शन केले
१९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाच्या सरकारने शेतकऱ्याच्या शोषणाची इंग्रज सरकारची वासाहतिक नीती चालूच ठेवली. त्यामुळे देशाच्या जनतेमध्ये आधी आर्थिक व अनुषंगाने सामाजिक, सांकृतिक व मानसिक दौर्बल्य तयार झाले. हे दौर्बल्य अधोरेखित करणाऱ्या ’इंडिया-भारत’ संकल्पनेचे उद्गाते, विकसित देशांत शेती चालू राहण्यासाठी शेतकऱ्यांना भरघोस अनुदाने दिली जातात. भारतात मात्र शेतकऱ्यांना उणे अनुदान दिले जाते, हे त्यांनी सप्रमाण सिद्ध केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment