दिनविशेष ११ डिसेंबर

दिनविशेष

दि. ११ डिसेंबर

* युनिसेफ (UNISEF - United Nations Children's Emergency Fund ) स्थापना दिन

संयुक्त राष्ट्रे बाल निधी किंवा युनिसेफ ही संयुक्त राष्ट्रांची एक विशेष संस्था आहे. जगभरातील लहान मुलांना अन्न व आरोग्याची सेवा पुरविणे हे युनिसेफचे ध्येय आहे

११ डिसेंबर १९४६ रोजी युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमरजन्सी फंड तयार करण्यात आला आणि दुसऱ्या महायुद्धाच्या धर्तीवर झालेल्या मुलांमध्ये आपत्कालीन अन्न आणि आरोग्य सेवा प्रदान करण्यात आली. बाल कुपोषणाच्या समस्येवर कोणत्या उपाययोजना कराव्यात याबाबत युनिसेफ अविकसित देशांत कार्यशाळा आयोजित करते. भारतातही अशा कार्यशाळा होतात. त्यांना युनिसेफ मदत करते


१. (१८९९) कादंबरीकार व तत्त्वचिंतक पुरूषोत्तम यशवंत देशपांडे यांचा जन्म

ते एक मराठी लेखक होते. नागपूरहून निघणाऱ्या विदर्भ साहित्य संघाचे मुखपत्र असलेल्या युगवाणी या त्रैमासिकाचे ते संपादकही होते. त्यांनी एकूण ४१ पुस्तके लिहिली. तुकोबांच्या कवित्वावर पुरुषोत्तम यशवंत देशपांडे यांनी अतिशय मौलिक आणि मनोज्ञ विवेचन केलेले आहे

२. (१९२२) चित्रपट अभिनेते दिलीपकुमार यांचा जन्म

ते हिंदी चित्रपटांत काम करणारे अभिनेते होते. ते हिंदी चित्रपटसृष्टीत ट्रॅजेडी किंग म्हणून ओळखले जात

३. (१९२५) बालसाहित्यकार राजा मंगळवेढेकर यांचा जन्म

ते मराठी बालसाहित्यकार आणि चरित्रकार होते. स्वातंत्र्यचळवळीत सक्रिय सहभाग घेत असताना त्यांना साने गुरुजींचा सहवास लाभला. यातूनच त्यांना मुलांसाठी लिहिण्याची प्रेरणा मिळाली. आजवर मंगळवेढेकरांनी विपुल साहित्यनिर्मिती केली आहे. यामध्ये २०० पेक्षा जास्त गोष्टी, कथा, कविता, चरित्रे, पत्रे आणि विज्ञान व पर्यावरण याविषयीची पुस्तके आहेत. आपला भारत, शोध भारताचा या त्यांच्या गाजलेल्या पुस्तकमालिका असून त्यांनी लिहिलेले साने गुरुजींचे चरित्रदेखील प्रसिद्ध आहे

४. (१९६७) कोयना येथे ६.५ रिश्टर तीव्रतेचा भूकंप होऊन १८० जण ठार आणि १५०० लोक जखमी झाले व मोठया प्रमाणात वित्तहानी झाली

५. (२००४) मॅगसेसे पुरस्कार व भारतरत्‍न पुरस्कार विजेत्या कर्नाटक शैलीतील गायिका एम.एस. सुब्बुलक्ष्मी यांचे निधन

६. (२०१२) भारतीय संगीतज्ञ व सुप्रसिद्ध सतारवादक पंडित रविशंकर यांचे निधन

ते इ. स. विसाव्या शतकातील सतारवादनातील एक श्रेष्ठतम वादक मानले जातात. अभिजात भारतीय संगीत परंपरेची ओळख पाश्चात्त्य जगतास करून देण्याच्या प्रयत्‍नांत त्यांनी मोलाची भूमिका बजावली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर