दिनविशेष २ डिसेंबर

दिनविशेष

दि. २ डिसेंबर

* जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन

२ डिसेंबर हा दिवस जागतिक गुलामगिरी मुक्तता दिन म्हणून जगभरात साजरा केला जातो. गरीब मुलांचा आणि गरजू स्त्रियांचा व्यापार करून, त्यांना कष्टांच्या कामाला जुंपणे, लैंगिक भुका भागविण्यास वापरणे, जबरदस्ती करून त्यांच्याकडून विविध नीच दर्जाच्या कामे करवून घेणे; ही गुलामगिरीची नवी आवृत्ती आहे. १९४९ साली संयुक्त राष्ट्रांनी या दिवसाची घोषणा करून, कुठल्याही स्वरूपाच्या गुलामगिरीचे जगभरातून उच्चाटन व्हावे म्हणून यादिवशी आवाहन केले जाते. त्यानंतर २००२ हे साल आंतरराष्ट्रीय वर्ष या कार्याची स्मृती म्हणून जाहीर झाले होते

या दिवशी सृजनमंडळी कथा-कवितांतून मुलाखतीद्वारा व अन्य प्रसारमाध्यमांचा वापर करून गुलामगिरीच्या कथा नि व्यथा मांडीत असतात. आकाशवाणी, दूरचित्रवाणी माध्यमातून मानवी हक्कांचा ऊहापोह करतात. बातमीपत्रे, पत्रके वाटून तसेच जागोजागी मोठमोठे फलक लावून गुलामगिरीचा काळीमा जनतेच्या लक्षात आणून दिला जातो. २ डिसेंबर २००९ च्या संदेशात युनोचे सरचिटणीस बान की मून म्हणाले होते त्यानुसार, गुलामगिरीचे उच्चाटन केवळ कायद्याने होणार नाही. या मोहिमेत गरिबी हटाव, साक्षरता प्रसार, लैंगिक समानता, हिंसेचे उच्चाटन हे कार्यक्रमदेखील अंतर्भूत व्हायला हवेत


* राष्ट्रीय प्रदूषण नियंत्रण दिन

औद्योगिक तसेच वैयक्तिक पातळीवरील प्रदूषणाने अनेक ठिकाणी धोक्याची पातळी ओलांडली आहे. याचा विपरीत परिणाम माणसांबरोबर इतर जीवसृष्टी, नैसर्गिक संसाधने आणि हवामानावरही होत आहे. प्रदूषणाच्या दुष्परिणांबाबत सर्वसामान्यांमध्ये जागरूकता वाढली पाहिजे याची गरज आता जगभरात निर्माण झाली आहे. २ डिसेंबर १९८४ च्या रात्री भोपाळजवळील युनियन कार्बाइडच्या कारखान्यातून विषारी वायूची गळती होऊन हजारो लोक मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेची आठवण, विशेषतः औद्योगिक क्षेत्राला राहावी आणि यापुढे असे प्रकार घडू नयेत यासाठी सर्वांनी काळजी घ्यावी, म्हणून हा दिवस भारतात पाळला जातो

शक्यतो सार्वजनिक वाहतूक सेवेचा वापर करून प्रदूषण टाळणे. या अतिशय साध्या वाटणा-या गोष्टी सुध्दा आपण आपल्या जीवनात रुजवल्या तरी सुध्दा प्रदूषण कमी करण्यासाठी आपला हातभार लागू शकतो. शिवाय, आपल्याकडून संस्कारातूनच पुढच्या पिढीला हा विचारांचा ठेवा मिळेल, जो अतिशय मौल्यवान आहे. या गोष्टी पाळल्या तरच थोड्या प्रमाणात का होईना पण पुढच्या पिढीसाठी निसर्ग उरेल तरी !

१. (१८५५) कायदेपंडित, समाजसुधारक, मुंबई उच्‍च न्यायालयाचे माजी न्यायाधीश सर नारायण गणेश चंदावरकर यांचा जन्म

हे अखिल भारतीय काँग्रेसच्या मूळ संस्थापकांपैकी एक, कायदेपंडित व समाजसुधारक होते

२. (१९०५) चतुरस्त्र साहित्यिक, कवी व पत्रकार अनंत काणेकर यांचा जन्म

ते मराठी कवी, लेखक, व पत्रकार होते. १९३५ ते १९३९ अशी चार वर्षे ते आधी 'चित्रा’ आणि नंतर `आशा’ या साप्ताहिकांचे संपादक होते. 'प्रभात'च्या 'माणूस' चित्रपटाचे ते संवादलेखक होते. तसेच नाट्यमन्वंतर या नाट्य संस्थेचे संस्थापक सदस्य होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर