दिनविशेष ९ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ९ नोव्हेंबर
१. (१८७७) तत्त्वज्ञ आणि राजकीय नेते, कवी सर मुहम्मद इक्बाल यांचा जन्म
त्यांनी लिहलेले 'सारे जहॉंसे अच्छा' हे सर्वपरिचित गाणे आहे
२. (१९६२) स्त्रीशिक्षण व विधवा विवाह यातील सुधारणकर्ते, समाजसुधारक, भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे निधन
महिलांचे शिक्षण, त्यांचे हक्क, विधवा-पुनर्विवाह यांसाठी आपले १०४ वर्षांचे जीवन वाहिले. इ.स. १९०७ साली त्यांनी महाराष्ट्रात पुण्याजवळील हिंगण्याच्या माळरानावर एका झोपडीत मुलींची शाळा सुरू केली. महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे जीवन म्हणजे सामाजिक सुधारणा विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी वाहिलेले आधुनिक ऋषितुल्य जीवन त्यांच्या कार्याचा प्रारंभ हा विधवाविवाह पासून झाला आणि त्याची परिणीती स्त्रियांच्या शिक्षणासाठी स्वतंत्र विद्यापीठ काढण्यामध्ये झाली
३. (१९६७) मराठी चित्रपट अभिनेते नटवर्य बाबूराव पेंढारकर यांचे निधन
ते मराठी चित्रपट-अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते होते. इ.स. १९२० साली त्यांनी सैरंध्री या मराठी चित्रपटाच्या लेखन-दिग्दर्शनाद्वारे चित्रपटक्षेत्रात पदार्पण केले. इ.स. १९२० च्या दशकापासून इ.स. १९६० च्या दशकापर्यंतच्या सुमारे ४५ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी पन्नासाहून अधिक चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे
४. (१९७७) गायक, अभिनेते, संगीत समीक्षक, संगीत रचनाकार, संगीत दिग्दर्शक व लेखक केशवराव भोळे यांचे निधन
गायक म्हणून कारकिर्दीस सुरुवात केलेल्या भोळ्यांनी गाण्यांना चाली बांधणेही आरंभले. १९३१ सालाच्या सुमारास मराठीत बोलपटांचे प्रमाण जसजसे वाढू लागले, तसतसे प्रसंगाच्या मांडणीस व पात्ररचनेस सुसंगत व उठावदार संगीत देण्याचे प्रयोग होऊ लागले. भोळ्यांनी त्या दृष्टीने सांगीतिक प्रयोग करून पाहिले. पार्श्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी 'कृष्णावतार' या चित्रपटामध्ये केला. प्रभात फिल्म कंपनीमध्ये असताना त्यांनी 'अमृतमंथन', 'माझा मुलगा', 'संत तुकाराम', 'कुंकू' इत्यादी चित्रपटांना संगीत दिले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment