दिनविशेष २७ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. २७ नोव्हेंबर

१. (१८८८) भारतीय लोकसभेचे पहिले अध्यक्ष गणेश वासुदेव मावळणकर यांचा जन्म

गणेश वासुदेव मावळणकर हे इ.स. १९५२ साली स्वतंत्र भारतात झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीद्वारे लोकसभेवर निवडून गेलेले संसद सदस्य होते. निवडणुकीनंतर बनलेल्या पहिल्या लोकसभेचे ते पहिले अध्यक्ष झाले

२. (१९०७) प्रख्यात हिंदी कवी हरिवंशराय बच्‍चन यांचा जन्म

ते हिंदी भाषेतील एक प्रसिद्ध कवी आणि लेखक होते. ते प्रसिद्ध हिंदी सिने-अभिनेते अमिताभ बच्चनचे वडील होते. हरिवंशराय बच्‍चन हे हिंदी कवितेतील उत्तर छायावादी काळातले प्रमुख कवी होते

३. (१९१५) मराठी साहित्यिक दिगंबर बाळकृष्ण तथा दि. बा. मोकाशी यांचा जन्म

ते एक मराठी कथा-कादंबरी लेखक होते. नेहमीच्या जीवनानुभवावर आधारित ललित कथांप्रमाणेच मोकाशी यांनी गूढकथा, पिशाच्चकथा, रहस्यकथा यांसारख्या वेगळ्या वळणाच्या कथाही लिहिल्या
अमेरिकन कादंबरीकार अर्नेस्ट हेमिंग्वे यांच्या ’फॉर हूम द बेल टोल्स‘ या कादंबरीचा ’घणघणतो घंटानाद’ हा त्यांनी केलेला अनुवाद उल्लेखनीय आहे

४. (१९७६) कादंबरीकार, समीक्षक आणि पत्रकार गजानन त्र्यंबक तथा ग. त्र्यं. माडखोलकर यांचे निधन

ते मराठी लेखक, कवी, पत्रकार व समीक्षक होते. आपल्या वाङ्‌मयीन कारकिर्दीच्या आरंभकाळात माडखोलकरांनी काही संस्कृत-मराठी कविता केल्या होत्या. रविकिरण मंडळाचे ते सदस्य होते. त्या मंडळाच्या १९२४ साली प्रकाशित झालेल्या ’उषा’ ह्या काव्यसंग्रहात त्यांच्या काही कविता आहेत

संस्कृतप्रचुर शब्दकळा व पल्लेदार रचनाशैली ही त्यांच्या कादंबरी लेखनाची वैशिष्ट्य. 'उषा' हा काव्यसंग्रह, 'देवयानी' हे नाटक, 'रातराणीची फुले' व 'शुक्राचे चांदणे' हे कथासंग्रह व १५ कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत

५. (२०१६) 'झोंबी'कार, मराठी लेखक आनंद यादव यांचे निधन

काव्य, कथा, कादंबरी, समीक्षा, ललित अशा विविध साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. ग्रामीण साहित्य संमेलन, समरसता साहित्य संमेलन आदी संमेलनांचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांच्या झोंबी या आत्मचरित्रासाठी इ.स. १९९० मध्ये त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर