दिनविशेष ३ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. ३ नोव्हेंबर
१. (१८१९) शाहीर, ’फटका’कार, गोंधळी अनंत फंदी यांचे निधन
त्यांची पदे, लावण्या, कटाव, फटके इ. विविध प्रकारची रचना रसाळ व प्रासादिक आहे. ‘लुंडे गुंडे हिरसे तट्टू’ हा त्यांचा उपदेशपर फटका विशेष लोकप्रिय आहे
२. (१९३३) कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी नोबेल पारितोषिक विजेते अमर्त्य सेन यांचा जन्म
सेन बंगाली-भारतीय अर्थशास्त्रज्ञ व तत्त्वज्ञ आहेत. यांना कल्याणाभिमुख अर्थशास्त्र व सामाजिक पर्याय सिद्धान्त या विषयांतील कार्यासाठी इ.स. १९९८ सालचे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. गरिबी, आरोग्य, शिक्षण, मानवी विकास आणि एकूणच मानवी कल्याण त्यांच्या विचाराचा गाभा आहे. भारतीय केंद्रशासनाने नालंदा विद्यापीठाच्या निर्मितीसाठी इ.स. २००७ साली बनवलेल्या नालंदा मार्गदर्शक समूहाचे हे अध्यक्ष आहेत. एकूण ४० वर्षात ३० हून अधिक भाषांत अमर्त्य सेन यांची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. ते 'ऑक्सब्रिज कॉलेज'चे पहिले आशियाई प्रमुख आहेत
३. (१९३७) चित्रपटसृष्टीत चार दशके लोकप्रिय संगीत देणार्या ’लक्ष्मीकांत-प्यारेलाल’ या जोडीतील संगीतकार लक्ष्मीकांत शांताराम कुडाळकर यांचा जन्म
१९६३ मध्ये 'पारसमणी' चित्रपटापासून सुरू झालेला त्यांचा सांगितिक प्रवास १९९८ पर्यंत अविरतपणे चालू होता. या ३५ वर्षांत त्यांनी ६५० चित्रपटांना संगीत देऊन संगीतविश्वात अढळपद निर्माण केले
४. (२०१४) मराठी नाट्य, चित्रपट अभिनेते सदाशिव अमरापूरकर यांचे निधन
कॉलेजमध्ये असताना त्यांनी 'पेटलेली अमावास्या' या एकांकितेत नायकाची आणि त्यांची पहिली-वहिली भूमिका केली होती. अमरापूरकरांनी श्याम बेनेगल यांच्या 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या दूरचित्रवाणी मालिकेत महात्मा फुले यांची भूमिका केली होती
सामाजिक जाणिवेतून सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या संस्था-संघटानांशीही अमरापूरकरांचा संबंध होता. सामाजिक कृतज्ञता निधीसाठी 'लग्नाची बेडी' या नाटकाचे गावोगावी प्रयोग झाले होते. त्या नाटकात सदाशिव अमरापूरकर भूमिका करत असत. मेधा पाटकरांच्या नर्मदा आंदोलनात त्यांचा सक्रिय सहभाग होता. वर्ध्याच्या गांधी आश्रमात ते नेहमी जात
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment