दिनविशेष २२ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. २२ नोव्हेंबर
१. (१८८६) पहिल्या स्त्री नाटककार, लेखिका, गायिका, संगीतकार हिराबाई पेडणेकर यांचा जन्म
हिराबाई पेडणेकर केवळ नाटक लिहीत नव्हत्या तर कविता निबंध लेखनही करत. त्या काळातल्या अव्वल दर्जाच्या 'मनोरंजन' मासिकात त्यांचे लेखन प्रसिद्ध होई. हिराबाईंनी वयाच्या विशीत १९०५ साली पहिले नाटक लिहिले ते 'जयद्रथ विडंबन.' ते रंगभूमीवर आले नसले तरी अनेकांनी ते वाचून हिराबाईंची प्रशंसा केली. त्यांचे 'संगीत दामिनी' (पहिला प्रयोग १९०८, पुस्तकरूपाने प्रकाशित सन १९१२) हे नाटक त्यानंतर काही वर्षांनी रंगभूमीवर आले आणि मराठी रंगभूमीच्या इतिहासात एक ऐतिहासिक नोंद झाली. कारण स्त्रीने लिहिलेले हे पहिले नाटक होते
२. (१९०९) स्वातंत्र्यसैनिक, विचारवंत, समाजसेवक आणि पत्रकार द. शं. तथा दादासाहेब पोतनीस यांचा जन्म
ते 'गावकरी' या मराठी भाषिक वृत्तपत्राचे चालक, पत्रकार होते. स्वातंत्र्य चळवळीत व महात्माजींच्या प्रत्येक सत्याग्रहात ते आघाडीवर असत. अनेकदा तुरुंगवास पत्करलेला हा स्वातंत्र्यलढय़ातील कार्यकर्ता आचार्य विनोबांच्या सर्वोदय चळवळीतील सक्रिय होता
३. (१९१३) आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ, मुत्सद्दी, कुशल प्रशासक, रिझर्व बँकेचे माजी गव्हर्नर, डॉ. लक्ष्मीकांत झा यांचा जन्म
४. (२०१९) दैनिक नवाकाळचे संपादक, अग्रलेखांचा बादशहा म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर यांचे निधन
'अग्रलेखांचा बादशहा' म्हणून ओळखले जाणारे नीळकंठ (ऊर्फ निळूभाऊ) खाडिलकर हे दैनिक नवाकाळ या वृत्तपत्राचे जवळपास २७ वर्षे संपादक होते. संपूर्ण अर्थशास्त्र हा विषय घेऊन ते बी.ए. ऑनर्स झाले होते. ज्येष्ठ नाटककार आणि ‘केसरी’चे भूतपूर्व संपादक कृ. प्र. खाडिलकर यांचे ते नातू होत. ते संध्याकाळ या नावाचे सायंदैनिकही काढीत असत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment