दिनविशेष २१ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. २१ नोव्हेंबर

* हुतात्मा स्मृती दिन

१८ नोव्हें १९५५ रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यासाठी सत्याग्रहींचा मोर्चा निघाला आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी लढा सुरू झाला. त्यावेळी मुंबई बंद पुकारले गेले. पोलिसांनी २१ नोव्हेंबर १९५५ रोजी निदर्शकांवर गोळीबार केला. या गोळीबारात १५ जणांना हौतात्म्य आले. संयुक्त महाराष्ट्रासाठीची चळवळ या गोळीबारानंतर उग्र झाली. त्यानंतर बऱ्याच दिवस चाललेल्या आंदोलनात एकूण १०७ जणांना हौतात्म्य आले. त्यांचे स्मारक पुढे हुतात्मा स्मारक म्हणून मुंबईत फ्लोरा फाउंटनजवळ २१ नोव्हेंबर १९६१ रोजी उभारण्यात आले. म्हणून महाराष्ट्रात २१ नोव्हेंबर हा दिवस हुतात्मा स्मृती दिन म्हणून साजरा केला जातो

* जागतिक दूरचित्रवाणी दिन
* World Television Day

जागतिक दूरचित्रवाणी दिन दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी साजरा केला जातो. जागतिक दूरचित्रवाणी दिन साजरा करण्याचा उद्देश जगभरातील इलेक्ट्रॉनिक उपकरणांपलीकडे दूरदर्शनचे महत्त्व पटवून देणे हा आहे. दूरचित्रवाणीच्या माध्यमातून लोक अनेक वर्षांपासून शिक्षण, बातम्या, राजकारण, मनोरंजन आणि गप्पांचा आनंद घेत आहेत

संयुक्त राष्ट्राने २१ नोव्हेंबर १९९६ रोजी हा 'जागतिक दूरचित्रवाणी दिन' म्हणून साजरा करण्याची घोषणा केली. १९९६ मध्ये झालेल्या पहिल्या वर्ल्ड टेलिव्हिजन फोरमच्या स्मरणार्थ दरवर्षी २१ नोव्हेंबर रोजी जागतिक दूरदर्शन दिन साजरा केला जातो. लोकांच्या निर्णयक्षमतेवर दृकश्राव्य माध्यमांचा वाढता प्रभाव आणि इतर प्रमुख मुद्द्यांवर लक्ष केंद्रित करण्यात त्याची संभाव्य भूमिका ओळखण्यासाठी संयुक्त राष्ट्रांनी नंतर एक ठराव स्वीकारला. त्यामुळे जनमताची माहिती, व्यवस्था आणि प्रभाव पाडण्याचे प्रमुख साधन म्हणून दूरदर्शन स्वीकारले गेले. दूरचित्रवाणी देखील आज संप्रेषण आणि जागतिकीकरणाचे प्रतिनिधित्व करते

युनायटेड नेशन्स (UN) ने ही कल्पना लोकप्रिय केली की, टेलिव्हिजन हे समकालीन जगात जागतिकीकरण आणि संवादाचे प्रतीक आहे. लोकांच्या मनोरंजनासोबत कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी टेलिव्हिजनने महत्त्वाची भूमिका बजावली आहे. दूरचित्रवाणीने कुटुंबातील सदस्यांना एकमेकांच्या जवळ आणले. दूरदर्शन हे माहिती आणि शिक्षणाचे प्रमुख स्त्रोत आहे, ते लोकांच्या निर्णय घेण्याच्या क्षमतेवर देखील प्रभाव टाकते. कारण ते जगात होत असलेल्या संघर्षांकडे लोकांचे लक्ष वेधून घेते. 'जागतिक दूरचित्रवाणी दिन' देखील समाजावर परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या समस्या आणि घटनांबद्दल निःपक्षपाती माहिती प्रदान करण्यासाठी, दूरचित्रवाणी माध्यमांच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सरकार, संस्था आणि व्यक्तींच्या भूमिकेचे कौतुक करण्यासाठी साजरा केला जातो

१. (१६९४) फ्रेंच तत्त्वज्ञ व लेखक व्होल्टेअर यांचा जन्म

ते एक फ्रेंच लेखक, कवी व तत्त्वज्ञ होते. व्हॅाल्टेअर यांनी नवलकथा, निबंध, नाटके, कविता, ऐतिहासिक, शास्त्रीय असे चौफेर लेखन केले व त्यातून त्यांनी फ्रान्समधील अनियंत्रीत राजेशाही, स्वार्थी धर्मगुरू व विलासी उमराव यांच्यावर कडाडून हल्ला चढवला. 'कॅन्डिड' हा त्यांचा विशेष प्रसिद्ध ग्रंथ आहे. त्यांनी एकूण २,००० पुस्तके तसेच २,००० पेक्षा अधिक पत्रे लिहिली. त्यांचे ललित लेखन उपरोधिक असे. लोकांच्या मनातील सुप्त भावनांना शब्दरूप करण्याचे महत्त्वाचे कार्य व्हॅाल्टेअर यांनी केले. फ्रांसमधील विषम समाजव्यवस्थेवर त्यांनी कडाडून टिका केली

२. (१९२७) मध्यमवर्गीय माणसाचे भावविश्व रेखाटणारे लेखक व नाटककार शं. ना. नवरे यांचा जन्म

ते मराठी लेखक, नाटककार व पटकथाकार होते. मध्यमवर्गीय माणसाचे अनुभव व भावनाविश्व रेखणाऱ्या कथानकांसाठी ते ओळखले जातात. शन्नाडे या नावाने त्यांनी वृत्तपत्रांतूनही स्तंभलेखन केले आहे. त्यांचे एकूण २७ कथासंग्रह आहेत. शं.ना. नवरे यांनी जयवंत दळवी यांच्या महानंदा कादंबरीवरून ’गुंतता हृदय हे’ हे नाटक लिहिले आहे. हे नाटक अमाप गाजले

डोंबिवलीत झालेल्या २००३ सालच्या नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांना लेखनातून मिळणाऱ्या पैशांचा मोठा हिस्सा ते पडद्यामागच्या कलाकारांसाठी खर्च करीत असत. कायम पडद्यामागे काम करणाऱ्या नाट्यकर्मींसाठी त्यांनी नाट्यसंमेलनातच ७५ हजार रुपयांचा धनादेश दिला होता

४. (१९५९) मराठी लेखक डॉ. राजन गवस यांचा जन्म

गवस हे मराठीतील नामवंत लेखक आहेत. त्यांच्या 'तणकट' या कादंबरीला २००१ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे. राजन गवस यांची 'चौंडकं' ही कादंबरी खूप गाजली. ते मुक्त लेखक आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर