दिनविशेष १८ नोव्हेंबर
दिनविशेष
दि. १८ नोव्हेंबर
१. (१९०१) चित्रपट निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते व्ही. शांताराम यांचा जन्म
शांताराम आधी प्रभात फिल्म कंपनीत होते. मात्र त्यानंतर त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली
त्यांना पुरस्कार दादासाहेब फाळके पुरस्कार (१९८५), पद्मविभूषण पुरस्कार (१९९२) पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यांचे प्रमुख चित्रपट दो आँखे बारा हात, नवरंग, पिंजरा हे होत
सुश्राव्य संगीत हा व्ही. शांताराम यांच्या चित्रपटनिर्मितीच्या यशातील महत्त्वाचा घटक मानला जातो. वसंत देसाई, लक्ष्मीकांत प्यारेलाल, रामलाल, राम कदम, हृदयनाथ मंगेशकर इ. नामवंत संगीत दिग्दर्शकांनी त्यांच्या चित्रपटांना संगीत दिले
२. (१९१०) भारतीय क्रांतिकारक बटुकेश्वर दत्त यांचा जन्म
त्यांनी ८ एप्रिल, इ.स. १९२९ रोजी नवी दिल्लीमधील केंंद्रीय विधिमंडळात भगत सिंग यांच्याबरोबर बॉम्बस्फोट घडवून आणले होते. यासाठी त्यांना आजन्म कारावासाची शिक्षा झाली. शिक्षेदरम्यान त्यांनी व भगतसिंग यांनी भारतीय राजकारणाच्या कैद्यांवरील अपमानास्पद वागणुकीविरोधात निषेध करणारे ऐतिहासिक उपोषण केले आणि अखेरीस त्यांच्यासाठी काही हक्क मिळवले
३. (२००६) मराठी कथाकार व कवी काव्यतीर्थ हणमंत नरहर जोशी तथा कवी सुधांशु यांचे निधन
ते मराठी भाषेतील कवी होते. त्यांनी अनेक मराठी भावगीते लिहिली आहेत. मराठी कवी कुंजविहारी यांनी त्यांना सुधांशु हे नाव दिले, आणि पुढे त्याच नावाने ते ओळखले जाऊ लागले
सुधांशूंनी भारताच्या १९४२ सालच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. आपल्या स्वातंत्र्यगीतांतून आणि पोवाड्यांतून त्यांनी स्वातंत्रसैनिकांना स्फूर्ती दिली
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्यांनी स्वतःला ग्रामसुधारणेला वाहून घेतले. इ.स. १९६० मध्ये ते अंकलखोप या गावाचे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आणि १९६५ पर्यंत त्या पदावर राहिले. त्याच सुमाराला गावाला स्वच्छतेचा आणि व्यसनमुक्तीचा पुरस्कारही मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment