दिनविशेष १३ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. १३ नोव्हेंबर

१. (१८५५) आद्य मराठी नाटककार गोविंद बल्लाळ देवल यांचा जन्म

स्वतंत्र मराठी लेखन आणि इंग्रजी, फ्रेन्च व संस्कृत नाटकांची भाषांतरे इ. अनेक प्रकार त्यांनी हाताळले होते

त्यांनी वेगवेगळ्या विषयांवर लिहिलेली नाटके - दुर्गा (१८८६), मृच्छकटिक (१८८७), विक्रमोर्वशीय (१८८९), झुंजारराव (१८९०), शापसंभ्रम (१८९३), संगीत शारदा (१८९९), आणि संशयकल्लोळ (१९१६). पैकी मृच्छकटिक, संगीत शारदा आणि संशयकल्लोळ या नाटकांना मराठीत मानाचे स्थान आहे

२. (१९१७) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, सहकारी साखर कारखानदारीचे आधारस्तंभ वसंतदादा पाटील यांचा जन्म

महाराष्ट्रातील सहकार क्षेत्राला एक वेगळे, निर्णायक वळण देऊन विकास साधणारे नेते म्हणजे वसंतदादा पाटील होत. क्रांतिकारक, स्वातंत्र्यसैनिक ते विधायक कार्य करणारे, पक्ष संघटना वाढवणारे राजकीय नेते, प्रभावी मुख्यमंत्री व सहकार महर्षी - असा त्यांचा जीवन प्रवास आपल्याला थक्क करतो


३. (१९१७) आधुनिक भारतातील प्रख्यात हिंदी कवी, समीक्षक, कथाकार, निबंधकार व विचारवंत गजानन माधव मुक्तिबोध यांचा जन्म

उन्हें प्रगतिशील कविता और नयी कविता के बीच का एक सेतु भी माना जाता है। मुक्तिबोध तारसप्तक के पहले कवि थे। मनुष्य की अस्मिता, आत्मसंघर्ष और प्रखर राजनैतिक चेतना से समृद्ध उनकी कविता पहली बार 'तार सप्तक' के माध्यम से सामने आई।

४. (२००१) ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका अंबूताई गोरे तथा सरोजिनी मधुसूदन शारंगपाणी यांचे निधन

'दुर्दैवाशी दोन हात' या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर