दिनविशेष ११ नोव्हेंबर

दिनविशेष 

दि. ११ नोव्हेंबर

१. (१८६८) रसाळ लावण्या लिहीणारे, लावणीसम्राट ’पठ्ठे बापूराव’ यांचा जन्म

पठ्ठे बापूरावांनी गण, गौळण, भेदिक, झगड्याच्या, रंगबाजीच्या, वगाच्या इ. विपुल लावण्या रचिल्या. त्यांतील काही तीन भागांत प्रसिद्ध झाल्या आहेत. बहुतेक तमाशांत पठ्ठे बापूरावांच्या लावण्या गायिल्या जातात आणि सगळे तमासगीर त्यांना पूज्य मानतात

२. (१८८८) स्वातंत्र्य चळवळीतील विद्वान नेते, भारताचे पहिले शिक्षणमंत्री, भारतरत्‍न मौलाना अबुल कलाम आझाद यांचा जन्म 

स्वातंत्र्यानंतर ते केंद्रीय मंत्रिमंडळात सामील झाले आणि अखेरपर्येत शिक्षणमंत्री म्हणून राहिले. आझाद प्रभावी वक्ते होते. त्यांचे इंग्रजी, उर्दू, अरबी व फार्सी भाषांवर चांगले प्रभुत्व होते; त्यांनी अनेक वृत्तपत्रांतून स्फुट लेखन केले आणि उर्दूत काही पुस्तके लिहिली आहेत


३. (१८८८) स्वातंत्र्यसेनानी, गांधीवादी, समाजवादी आणि पर्यावरणवादी नेते आचार्य कॄपलानी यांचा जन्म 

ते भारताच्या स्वतंत्रता लढ्यातील एक राजकीय नेते होते व स्वतंत्रता सैनिक होते. भारताला स्वातंत्र्य मिळाले त्यावेळेस कृपलानी हे राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष होते. ते गांधीवादी नेता होते. ते महात्मा गांधी चे अनुयायी होते

४. (२००४) नोबेल पारितोषिक विजेते पॅलेस्टाईनचे नेते यासर अराफत यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर