दिनविशेष २ नोव्हेंबर

दिनविशेष

दि. २ नोव्हेंबर

* औद्योगिक सुरक्षा दिन
* Industrial Safety Day

२ नोव्हेंबर हा दिवस 'औद्योगिक सुरक्षा दिन' म्हणून साजरा केला जातो. औद्योगिक ठिकाण असणाऱ्या जागी काम करणाऱ्या सर्व कामगारांना त्यांच्यासाठी उपलब्ध असणाऱ्या सर्व सोयी सुविधा व सुरक्षांची जाणीव व्हावी यासाठी हा दिवस पाळला जातो. कामगारांनी त्यांच्या सुरक्षिततेसाठी व संरक्षणासाठी कामाच्या ठिकाणी लागू असलेल्या योजनांचा त्यांनी पुरेपूर वापर करणे महत्त्वाचे आहे

१. (१८८५) महाराष्ट्रातील जेष्ठ संगीत नाटककार, दिग्दर्शक बळवंत पांडुरंग तथा अण्णासाहेब किर्लोस्कर यांचे निधन

त्यांनी महाराष्ट्रात संगीत नाटकाचे नवे युग निर्माण केले व उत्तम संगीतनाटकाचा आदर्श घालून दिला. 'संगीत सौभद्र' व 'संगीत शाकुंतल' या गाजलेल्या नाटकाचे ते नाटककार होत

२. (१९५०) नोबेल पारितोषिक विजेते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे (LSE) सहसंस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचे निधन

ते आयरिश लेखक आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सह-संस्थापक होते. संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्‍द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई

श्रमिक वर्गाच्या शोषणावर त्यांना फार राग होता. एक उत्कट सोशलिस्ट, शॉ यांनी फेबियन सोसायटीसाठी अनेक पत्रिका व व्याख्याने लिहिली आहेत. या सोसायटीत दिलेल्या व्याख्यानांतून, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी महिला व पुरुष समान हक्क मिळविणे, कामगार वर्गाच्या अपेष्टा कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीच्या संपादन करणे या विषयांचा प्रचार केला आणि ते एक प्रभावी वक्ता बनले

३. (१९६५) सुप्रसिद्ध अभिनेता व निर्माता शाहरुख खान याचा जन्म

४. (१९९०) प्लॅस्टिक व नायलॉन उद्योगाचे जनक, महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार, उद्योजक भालचंद्र दिगंबर तथा आबासाहेब गरवारे यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर