दिनविशेष २७ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. २७ ऑक्टोबर
१. (१८७३) कवी भास्कर रामचंद्र तथा भा. रा. तांबे यांचा जन्म
भा. रा. तांबे यांना आधुनिक मराठीतील गीतकाव्याचे प्रवर्तक मानण्यात येते. अर्वाचीन मराठी कवींमधील एक मान्यताप्राप्त कवी. ते ग्वाल्हेर संस्थानाचे ’राजकवी’ होते. हिंदी काव्य, उर्दू नज़्म आणि गज़ल यांच्याशी झालेला परिचय, तसेच वैदिक परंपरेचे शास्त्रशुद्ध शिक्षण असे संस्कार घेऊन तांबे यांनी मराठी कवितेत विशुद्ध आनंदवादाची मळवाट रुंद केली. ’राजकवी भास्कर रामचंद्र तांबे यांची समग्र कविता’ या ग्रंथात त्यांची कविता १९३५ मध्ये प्रकाशित झाली आहे. या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत
२. (१९२०) भारताचे १० वे राष्ट्रपती के. आर. नारायणन यांचा जन्म
जुलै इ.स. १९९७ ते जुलै इ.स. २००२ काळादरम्यान भारतीय प्रजासत्ताकाचे दहावे राष्ट्रपती होते. भारतीय प्रजासत्ताकाच्या राष्ट्रपतीपदावर आरूढ होणारे ते पहिले दलित व पहिले मल्याळी व्यक्ती होते
३. (१९४७) समाजसेवक डॉ. विकास आमटे यांचा जन्म
डॉ. विकास आमटे हे महाराष्ट्रातील समाजसेवक आहेत.
विकास आमटे हे बाबा आमटे यांचे चिरंजीव असून ते आपल्या कुटुंबासह बाबा आमटे यांनी सुरू केलेल्या आनंदवन प्रकल्पाची देखरेख करतात
४. (२००१) बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार, फास्टर फेणे आणि बिपीन बुकलवार या पात्रांचे जनक भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचे निधन
ते बालसाहित्य लिहिणारे मराठी कादंबरीकार, पत्रकार, भाषांतरकार, कादंबरीकार आणि विनोदी लेखक होते. ते 'भा.रा. भागवत' या नावानेच प्रसिद्ध होते. मराठीतील पहिल्या बाल-कुमार साहित्य संमेलनाचे (१९७६) अध्यक्षपद त्यांनी भूषवले. त्यांनी लहान मुलांसाठी - विशेषतः कुमार वयोगटासाठी - अनेक कादंबऱ्या व साहसकथा लिहिल्या. तसेच अनेक कथा, कादंबऱ्या व विज्ञानकथा यांची इंग्रजीतून भाषांतरे आणि रूपांतरे केली. त्यांनी 'ज्यूल व्हर्न' या प्रसिद्ध व आद्य-विज्ञानकथालेखकाचे संपूर्ण लेखन मराठीत भाषांतरीत वा रूपांतरित केले. त्यांनी निर्माण केलेले फास्टर फेणे आणि बिपिन बुकलवार हे नायक इ.स. १९७० आणि १९८० च्या दशकात प्रसिद्धी पावले. मुलांसाठी त्यांनी 'बालमित्र' हे नियतकालिक चालवले; तसेच 'पुस्तकहंडी'सारखे उपक्रमही केले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment