दिनविशेष ८ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. ८ ऑक्टोबर

* भारतीय वायुसेना दिन

भारतीय वायुसेना दिन दरवर्षी ८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. ८ ऑक्टोबर १९३२ मध्ये भारतीय वायुसेना अधिकृतपणे युनायटेड किंगडमच्या रॉयल एअर फोर्ससाठी सहाय्यक दल म्हणून स्थापित करण्यात आली होती. तसेच भारतीय हवाई दलाचे पहिले ऑपरेशनल स्क्वॉड्रन पुढील वर्षी १९३३ साली ८ ऑक्टोबर रोजीच करण्यात आले. या सर्व कारणांमुळे हा दिवस वायुसेना दिन म्हणून साजरा केला जातो

१. (१९२६) अभिनेते कुलभूषण पंडित तथा ’राजकुमार’ ऊर्फ ’जानी’ यांचा जन्म

हिंंदी चित्रपटसृष्टीत अनेक सुपरस्टार झाले पण केवळ दमदार संवादफेकीच्या शैलीवर प्रेक्षकांचे हृदय जिंकणारे डॉयलॉगचे बेताज बादशहा अभिनेते राजकुमार उर्फ जानी 

२. (१९३५) धावपटू, ’द फ्लाइंग सिख’ मिल्खा सिंग यांचा जन्म

मिल्खा सिंग हे भारतीय धावपटू होते. भारतीय लष्कराच्या सेवेत असताना ते या खेळाकडे आकृष्ट झाले. १९५८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक मिळविले. त्यांना 'फ्लाइंग सिख' या टोपण नावाने ओळखले जाते

३. (१९३६) हिंदी साहित्यिक, ‘उपन्यास सम्राट', 'गोदान'कार धनपतराय श्रीवास्तव उर्फ मुन्शीचंद यांचे निधन
 
हे हिंदी व उर्दू साहित्यातील नावाजलेले लेखक होते. त्यांना उपन्यास सम्राट म्हणून गौरविले जाते. प्रेमचंदांनी इ.स. १९१३ ते इ.स. १९३१ पर्यंत एकूण २२४ कथा, १०० लेख आणि १८ कादंबऱ्या लिहिल्या


४. (१९६२) प्र. के. अत्रे लिखित 'तो मी नव्हेच' या नाटकाचा पहिला प्रयोग आजच्याच दिवशी सन १९६२ मध्ये दिल्लीच्या 'आयफॅक्स' नाट्यगृहात झाला होता. आजही प्रभाकर पणशीकर यांचा लखोबा लोखंडे अजरामर आहे

५. (१९७९) स्वातंत्र्यसैनिक आणि सर्वोदयी चळवळीचे नेते लोकनायक जयप्रकाश नारायण यांचे निधन

६. (१९९६) स्वातंत्र्यसैनिक लेखिका गोदावरी ताई परूळेकर यांचे निधन 

महाराष्ट्रातील पहिल्या स्त्री वकील म्हणून त्यांनी सनद मिळवली. तलासरी, डहाणू, शिरगाव या भागातील डोंगरदर्‍यांत फिरून वारल्यांच्या पिळवणुकीचे अनुभव त्यांनी ऐकले व आदिवासींमधे जागृतीचे कार्य केले. ’जेव्हा माणूस जागा होतो’ हे त्यांचे पुस्तक वेगळ्या जगाची ओळख करुन देणारे आहे. या पुस्तकासाठी त्यांना १९७२ चा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला होता

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर