दिनविशेष ६ ऑक्टोबर

दिनविशेष 

दि. ०६ ऑक्टोबर

१. (१९१३) कवी केशवसुत पारितोषिक विजेते, मराठी कवी, गीतकार वामन रावराव तथा वा. रा. कांत यांचा जन्म


२. (१९४३) संत साहित्याचे गाढे अभ्यासक, समीक्षक डॉ. रत्नाकर मंचरकर यांचा जन्म

३. (१९५६) गायिका रंजना जोगळेकर यांचा जन्म 

राम कदम यांनी ‘दुनिया करी सलाम’ या चित्रपटातून रंजना जोगळेकरांना पार्श्वगायनाची पहिली संधी दिली. भावगीतांच्या या काळात रंजना अनेक ध्वनिफितींसाठीदेखील गाणी गायल्या. त्यांनी गायलेल्या ‘रानात सांग कानात’, ‘माझं कोकरू’, ‘मृगजळाचे गाव माझे’, ‘सजणा पुन्हा स्मरशील ना’, ‘माघाची थंडी’ या ध्वनिफिती गाजल्या

४. (१९७९) इतिहासकार, लेखक, वक्ते पद्मविभूषण महोपाध्याय दत्तो वामन पोतदार यांचे निधन

मराठी, हिंदी, संस्कृत, इंग्रजी, उर्दू या भाषांवर प्रभुत्व असलेल्या पोतदारांनी इतिहासलाच आपले सर्वस्व मानले. त्यांनी शिवचरित्राचे पैलू, मराठी गद्याचा इंग्रजी अवतार आदी ग्रंथ लिहिले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर