दिनविशेष ३१ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. ३१ ऑक्टोबर

* राष्ट्रीय एकता दिवस

१. (१८७५) भारताचे पहिले गृहमंत्री, लोहपुरुष, सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्म

वल्लभभाई पटेल यांनी देशाच्या स्वातंत्र्य लढ्यासाठी व स्वातंत्र्यप्राप्तीनंतर भारताच्या राजकीय एकसंघीकरणात मोठे योगदान दिले. त्यांना भारतीय महिलांनी ‘सरदार’ ही उपाधी दिली

वल्लभभाई पटेल हे भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशाचे पहिले गृहमंत्री व उपपंतप्रधान झाले. या रूपात त्यांनी पाकिस्तानातून आलेल्या आणि पंजाब व दिल्ली येथे राहणाऱ्या निर्वासितांच्या मदतीसाठी खूप काम केले. फाळणीनंतर उफाळलेल्या हिंसाचारानंतर शांतीस्थापनेकरीताही त्यांनी कार्य केले. सरदारांनी हिंदुस्थानातील ५६५ अर्धस्वायत्त संस्थानांचे भारतात विलीनीकरण करवून घेणे हे पटेलांचे सर्वात मोठे कार्य होय. मुत्सद्देगिरी व वेळ पडल्यास सैन्यबळ वापरून सरदारांनी संस्थाने भारतात विलीन केली आणि म्हणूनच ते भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखले जातात. त्यांचा जन्मदिवस भारत सरकारने 'राष्ट्रीय एकता दिन' म्हणून घोषित केला आहे


२.  (१९७५) संगीतकार व पार्श्वगायक सचिन देव बर्मन यांचे निधन

हे हिंदी चित्रपटसृष्टीतील संगीतकार व पार्श्वगायक होते

३. (१९८४) भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांचे निधन

एक भारतीय राजकारणी आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रमुख नेत्या होत्या. १९६६ मध्ये त्या भारताच्या तिसऱ्या पंतप्रधान म्हणून निवडल्या गेल्या. इंदिरा गांधी या भारताच्या पहिल्या आणि आजपर्यंतच्या एकमेव महिला पंतप्रधान आहेत. त्या भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या कन्या होत्या. जानेवारी १९६६ ते मार्च १९७७ पर्यंत आणि पुन्हा जानेवारी १९८० ते ऑक्टोबर १९८४ मध्ये त्यांची हत्या होईपर्यंत त्यांनी पंतप्रधान म्हणून काम केले

४. (१९८६) लेखिका, बालसाहित्यिका आनंदीबाई शिर्के यांचे निधन

'सांजवात' या आत्मचरित्रामुळे मराठी साहित्यात मानाचे स्थान मिळवणार्‍या आनंदीबाई शिर्के या शंभर वर्षांपूर्वीच्या काळातील एक मान्यवर लेखिका होत. ज्या काळात स्त्री-शिक्षणालाच समाजाचा मोठ्या प्रमाणात विरोध होता, त्या काळात खानदानी मराठा कुटुंबातील या स्त्रीने आपली सुधारक मते ठामपणे मांडली आणि दृढपणाने ती अमलातही आणली

सन १९१० मध्ये मासिक मनोरंजन मध्ये 'शारदाबाईचे संसारचित्र' ही त्यांची कथा कु. आनंदी या नावाने प्रसिध्द झाली, तर मराठा मित्र मासिकात 'बेगम दिलआरा ही मुघल प्रेमकथा' प्रकाशित झाली

५. (२००५) पंजाबी आणि हिंदी भाषेतील प्रतिथयश लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचे निधन

अमृता प्रीतम या भारतातील महान साहित्यिकांपैकी एक गणल्या जातात. किशोरावस्थेत त्यांनी कविता, कथा व निबंध इत्यादी लेखन करण्यास सुरुवात केली. त्यांची पन्नासहून अधिक पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यांनी लिहिलेल्या साहित्यापैकी काही साहित्यकृतींचा अनेक देशी-विदेशी भाषांमध्ये अनुवाद झाला आहे. त्यांच्या ’कागज ते कॅनव्हास’ या कवितासंग्रहासाठी त्यांना ज्ञानपीठ पुरस्कार (१९८२) देण्यात आला. ’रसीदी टिकट’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे

६. (२००९) मराठीत तमाशाप्रधान चित्रपटांची चलती असताना पडद्यावर केवळ सोज्ज्वळ नायिका रंगवून आपल्या सहजसुंदर अभिनयाची मोहोर उमटवणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुमती गुप्ते यांचे निधन

‘फोटोजेनिक चेहरा असणारी एकमेव मराठी अभिनेत्री’ असा बाबूराव पटेलांसारख्या दिग्दर्शकाकडून अभिप्राय सुमती गुप्ते यांनी मिळवला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर