दिनविशेष ३० ऑक्टोबर
दिनविशेष
दि. ३० ऑक्टोबर
* जागतिक बचत दिन
* World Saving Day
भारतामध्ये 'जागतिक बचत दिन' ३० ऑक्टोबरला साजरा केला जातो. प्रथम World Saving Day सन १९२५ मध्ये साजरा करण्यात आला. चांगले जीवनमान मिळविण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेची घडी सुरळीत चालण्यासाठी पैसे वाचवणे महत्वाचे आहे. त्याच अनुषंगाने जागतिक बचत दिवस अनेक देशांमध्ये खूप लोकप्रिय आहे आणि या आकर्षणाचे कारण म्हणजे बचत करण्यामध्ये सहसा अनेक अडथळे असतात
जगातील बर्याच भागात बेरोजगारी आणि दारिद्र्य यांचे उच्च दर अजूनही मजबूत आहेत. पैशाची बचत करण्यासाठी लोकांना शिक्षण देणे खूप महत्वाचे आहे. जीवनातल्या वाईट दिवसांशी सामना करण्यासाठी बचत करणे महत्त्वाचे आहे. जागतिक बचत दिन आपल्याला नियमित बचत करण्याचे फायदे सांगतो. बचत एखाद्या व्यक्तीस एखादा व्यवसाय सुरू करणे, चांगल्या आरोग्य सेवेचा लाभ घेणे, चांगले शिक्षण मिळविणे यासारख्या गोष्टींमध्ये मदत करतो. तुमच्या आत्मविश्वासासाठी तरी तुम्ही बचत केलीच पाहिजे. तुमच्या बचतीच्या स्थितीवरून तुमची समाजातली पत ठरणार आहे हे नक्की!
१. (१९०९) भारतीय अणुऊर्जा व अण्वस्त्र विकास कार्यक्रमाचे प्रणेते भौतिकशास्त्रज्ञ डॉ. होमी जहांगीर भाभा यांचा जन्म
भारताच्या स्वातंत्र्यानंतर इ.स. १९४८ साली त्यांच्या पुढाकाराने अणु उर्जा आयोगाची स्थापना करण्यात आली. या संस्थेचे ते संचालक म्हणून काम पाहू लागले. त्यांच्या अथक परिश्रमांमुळेच भारत देशात अणु भट्टीची स्थापना होऊ शकली. अणुचा वापर शांततेच्या मार्गानेच व्हावा असे ठाम मत संयुक्त राष्ट्राच्या सभेत मांडणारे भाभा हे पहिले वैज्ञानिक. डॉ. होमी भाभा यांनी पाया रचला म्हणूनच भारताने अनेक ठिकाणी अणु भट्या सुरू करून त्यांचा विज निर्मितीसाठी उपयोग केला. तसेच १८ मे, इ.स. १९७४ या दिवशी भारताने पोखरण येथे पहिला अणुस्फोट घडवून आणला
२. (१९९०) चित्रपटनिर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते, पद्मश्री, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते व्ही. शांताराम यांचे निधन
पिंजरा, अमर भूपाळी, दो आँखे बारह हाथ, डॉ कोटणीस की अमर कहाणी यासारखे दर्जेदार चित्रपट त्यांनी दिले. चार्ली चॅप्लिन यांनी त्यांच्या दिग्दर्शनाचे तोंड भरून कौतुक केले होते. त्यांनी राजकमल कलामंदिर ही स्वतःची चित्रपट निर्माती कंपनी काढली
३. (१९९६) लेखक, पत्रकार व कामगार संघटनेचे कार्यकर्ते प्रभाकर नारायण ऊर्फ भाऊ पाध्ये यांचे निधन
हे मराठी कादंबरीकार, कामगार चळवळकर्ते होते
४. (२०१८) लेखक व दिग्दर्शक 'जीवनात ही घडी अशीच राहू दे' हे अप्रतिम गाणे देऊन जीवनाचा मतितार्थ सांगणारे गीतकार, संगीतकार यशवंत देव यांचे निधन
आपल्या वडिलांकडून मिळालेला संगीत साधनेचा वारसा यशवंत देव यांनी समर्थपणे पुढे नेला. आकाशवाणीवर सुगम संगीत विभागात सतारवादक म्हणून त्यांनी कारकीर्द सुरू केली. मुंबई आकाशवाणी केंद्रावर त्यांनी सादर केलेला ‘भावसरगम’ हा कार्यक्रम चांगलाच गाजला. त्याद्वारेच, संगीतकार, गायक आणि कवी ही त्यांची ओळख महाराष्ट्राला झाली. शब्दप्रधान गायकीचे उद्गाते, अशी त्यांनी स्वतःची प्रतिमा निर्माण केली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment