दिनविशेष २९ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. २९ ऑक्टोबर

* आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन
* International Internet Day

आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन दरवर्षी २९ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. अणुयुद्धाच्या प्रसंगी माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी अमेरिकन सैन्यासाठी संगणक नेटवर्क तयार करण्यात आले तेव्हा १९६९ मध्ये इंटरनेटचा उगम झाला. इंटरनेटला ARPANET (Advanced Research Projects Agency Network) म्हणून ओळखले जात असे. चार्ली क्लाइनने २९ ऑक्टोबर १९६९ रोजी पहिला इलेक्ट्रॉनिक संदेश प्रसारित केला. २००५ मध्ये पहिल्यांदा आंतरराष्ट्रीय इंटरनेट दिन साजरा करण्यात आला

इंटरनेटमुळे लाखोंचे जीवन सुकरविज्ञान, अभ्यास, व्यवसाय, नोकरीचा शोध, सरकारी कामे, बिल भरणे, बँकिंग व्यवहार, पत्रव्यवहार, संभाषण, तिकीट खरेदी, हवामानाची माहिती, मनोरंजन, व्हिडिओ फिल्म, फोटो, स्टोरी, विनोद, कॉमेडी, चित्रपट, बातम्या अशा असंख्य गोष्टी विज्ञानामुळे आपल्या तळहातात आल्या आहेत. आज आपण परदेशातील वर्तमानपत्रे, मासिके आणि सिनेमे यासारख्या शेकडो गोष्टी आपल्याला घरबसल्या मिळतात हे सर्व इंटरनेटमुळे उपलब्ध झाले

सध्याच्या जगात इंटरनेट ही सगळ्यात महत्वाची गोष्ट झाली आहे. माहिती ते मनोरंजन सर्व गोष्टींसाठी सध्या इंटरनेटची आवश्यकता पडते. इतकेच नाही तर हे इंटरनेट हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष अशा दोन्ही स्वरुपात आज भारतीय अर्थव्यवस्थेत वार्षिक ७. १० लाख कोटी रुपयांचे योगदान देत आहे. शेकडो लोकांच्या उत्पन्नाचे इंटरनेट साधन बनले आहे


* जागतिक स्ट्रोक दिन
* World Stroke Day

जागतिक स्ट्रोक दिन २९ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. पक्षाघात किंवा ब्रेन अटॅक या गंभीर आजाराची माहिती, कारणे व उपचाराची जागरुकता सर्वसामान्यांना व्हावी म्हणून जगभरात 'जागतिक स्ट्रोक दिन' साजरा केला जातो

स्ट्रोकमुळे आजही मोठ्या प्रमाणावर लोकांचा बळी जात आहे. त्यामुळे त्याची लक्षणे समजून घेणे गरजेचे आहे. वृद्धांमध्ये धोका जास्त असला तरी तरुणांनाही या आजाराबाबत माहिती असणे गरजेचे आहे

स्ट्रोक तेव्हा होतो जेव्हा रक्तवाहिन्यांमध्ये रक्ताच्या गुठळ्या किंवा प्लेक्सच्या स्वरूपात चरबी जमा होते. यामुळे मेंदूला होणारा रक्तप्रवाह कमी होतो किंवा पूर्णपणे बंद होतो. हे रक्तातील ऑक्सिजन आणि पोषक तत्वांचा प्रवाह अवरोधित करते. ज्यामुळे मेंदूच्या पेशी काही मिनिटांतच मरतात. मेंदूतील रक्तस्त्राव काही प्रकरणांमध्ये स्ट्रोक देखील होऊ शकतो. जेव्हा नुकसान खूप मोठे असते

१. (१९११) हंगेरीयन-अमेरिकन राजकीय नेते आणि प्रकाशक, वृत्तपत्र क्षेत्रात विशेष कामगिरी बजावणार्‍यांना देण्यात येणार्‍या पुलित्झर पुरस्कारांचे प्रवर्तक जोसेफ पुलित्झर यांचे निधन

हे पत्रकारिता क्षेत्रातील फार मोठं नाव आहे. जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने पत्रकारितेतील नोबेल समजला जाणारा पुलित्झर पुरस्कार दिला जातो. हा पुरस्कार पत्रकारिता ( Journalism ), पुस्तके ( Books ), नाटक ( Drama ) आणि संगीत ( Music ) क्षेत्रात विशेष कामगिरीसाठी देण्यात येतो. जोसेप पुलित्झर हे वृत्तपत्र संपादक होते

'पुलित्झर पुरस्कार' हा अमेरिकन-हंगेरियन पत्रकार जोसेफ पुलित्झर यांच्या नावाने अमेरिकेत दिला जाणारा वार्षिक पुरस्कार आहे. जगभरात वृत्तपत्र, पत्रकारिता, साहित्य आणि संगीत या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्यांना व्यक्तींना हा पुरस्कार दिला जातो. पाच सदस्यांची समिती या पुरस्कारांची निवड करते. ४ जून १९१७ रोजी पहिल्यांदा याची घोषणा करण्यात आली होती. हा पुरस्कार एकूण २१ श्रेणींमध्ये दिला जातो. यासोबतच शिष्यवृत्तीही दिली जाते. हा पुरस्कार मिळलेल्या व्यक्तीला प्रमाणपत्र आणि १० हजार डॉलर्स रोख रक्कम दिली जाते

२. (१९३१) कथा, कादंबरी, प्रवासवर्णन, नाटक, चित्रपट अशा साहित्याच्या सर्वच प्रांतात लोकप्रिय असणारे मराठी लेखक प्रभाकर तामणे यांचा जन्म

त्यांनी लिहिलेले एक धागा सुखाचा, मधुचंद्र हे चित्रपट व अशीच एक रात्र येते हे फ्लॅशबॅक तंत्रातल नाटक खूप गाजले. त्यांचा कथेवर राज कपूर यांनी 'बिवी ओ बिवी' हा चित्रपट काढला. विनोदीलेखक म्हणूनही ते गाजले

३. (१९७८) भारतातील वैद्यकीय संशोधनाचा पाया घालणारे शास्त्रज्ञ वसंत रामजी खानोलकर यांचे निधन

कर्करोगावर संशोधन करण्यासाठी भारतामध्ये तंत्रज्ञान आणि साधनसामग्री उपलब्ध व्हावी यासाठी त्यांनी केलेल्या मागणीचे मूल्यमापन एका खास सरकारी समितीने केले. या कामासाठी अमेरिकेहून इ. व्ही. कॉद्रे यांनाही बोलावण्यात आले होते. सर्वानुमते खानोलकरांना संशोधनासाठी एक राष्ट्रीय प्रयोगशाळा देण्यात यावी असे ठरले. अखेर, १९५२ मध्ये इंडियन कॅन्सर रिसर्च सेंटर (आय. सी.आर.सी.) सुरू करण्यात आले. यासाठी अनेक जागतिक संस्थांचे आर्थिक पाठबळ मिळाले, त्यात रॉकफेलर फाउंडेशन, जागतिक आरोग्य संघटना होत्या

कर्करोगाव्यतिरिक्त खानोलकरांनी कुष्ठरोगावरही संशोधन केले. पुनरुत्पादनाचे शरीरशास्त्र यावर कार्य करण्यामध्ये खानोलकरांचा भर होता. या त्यांच्या उपक्रमातूनच इंडियन काउन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने कुटुंबनियोजनाचा शास्त्रीय अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली. खानोलकर ७ वर्षे या समितीचे अध्यक्ष होते. इंडियन ॲसोशिएशन ऑफ पॅथॉलॉजिस्ट अँड मायक्रोबायॉलॉजिस्ट या संघटनेची स्थापना त्यांनी केली. भारतात वैद्यकीय संशोधन सुरू करण्याचे श्रेय खानोलकर व त्यांचे जवळचे मित्र सी. जी. पंडित आणि बी. बी. दीक्षित यांना जाते. खानोलकर अनेक भाषा पारंगत होते. ६ भारतीय आणि ४ यूरोपियन भाषा ते बोलू आणि वाचू शकत होते

४. (१९८५) ऑलिंपिक पदक विजेते भारतीय बॉक्सर विजेंदर सिंग यांचा जन्म 

५. (२०१६) मराठी विचारवंत लेखक वसंत पळशीकर यांचे निधन

मूलगामी आणि सर्वंकष लेखनासाठी ते ओळखले जात होते. प्रत्येक विषयाचा गाढा अभ्यास असलेल्या पळशीकर यांनी सामाजिक- राजकीय प्रश्न, चळवळी, धर्म, विज्ञान, पर्यावरण अशा विविध विषयांवर लिखाण केले आहे. नवभारत आणि समाज प्रबोधन पत्रिका या मासिकाचे ते संपादक होते. पळशीकर यांच्याकडे ज्ञान आणि माहितीचा खजिना म्हणूनच बघितले जात होते. पर्यावरण, कामगारविषयक, स्त्री- पुरुषविषयक, धर्म-अंधश्रद्धेपासून ते गांधी, फुले, आंबेडकर यांच्यापर्यंतच्या अनेक विषयांवर पळशीकर यांनी लेखन केले होते. त्यांनी विविध नियतकालिकांत वेळोवेळी केलेले लेखन सुमारे तीन हजार पानांपेक्षा अधिक आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर