दिनविशेष २८ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. २८ ऑक्टोबर

* आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन
* International Animation Day

दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा केला जातो. आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा करण्याचा उद्देश लोकांमध्ये ॲनिमेशनच्या महत्त्वाबद्दल जागरुकता निर्माण करणे आणि जगभरातील अनेक ॲनिमेशन कलाकारांनी केलेल्या मेहनतीची ओळख करून देणे हा आहे. ॲनिमेशनच्या जगात आपण दररोज एक नवीन चमत्कार पाहतो. व्यावसायिक रंगभूमीपासून सुरू झालेले ॲनिमेशन आज थ्रीडी आणि स्पेशल इफेक्टसह मोठ्या पडद्यावर पोहोचले आहे

२००२ मध्ये, आंतरराष्ट्रीय ॲनिमेटेड फिल्म असोसिएशन (असोसिएशन इंटरनॅशनल डु फिल्म डी' ॲनिमेशन) द्वारे आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिवस घोषित करण्यात आला. तेव्हापासून दरवर्षी २८ ऑक्टोबर रोजी आंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन साजरा केला जातो. कारण 28 ऑक्टोबरला पहिल्यांदा ॲनिमेशनचा वापर करण्यात आला होता


१. (१८११) श्रीमंत यशवंतराव होळकर यांचे निधन

ते होळकर साम्राज्याचे महाराजा होते. यशंवतरावांनी आपल्या पराक्रमाची चुणूक १७९५ घ्या खर्ड्याच्या निजामाविरूद्ध झालेल्या युद्धात दाखवून दिली ह्या युद्धात यशंवतराव आपले पिता तुकोजीरावासोबत दहा हजार सैन्यासह सामील झाले होते त्या वेळी त्यांचे वय १९ वर्ष या युद्धात निजामाचा पराभव केला.यशंवतराव होळकर सलग इंग्रजांविरुद्ध १८ युद्ध अपराजित राहिलेे आणि त्यांनी जागतिक इतिहास रचला, इंग्रजांविरूद्ध सलग एकही युद्ध न हारणारा एकमेव महाराजा अशी ख्याती मिळवली, मध्ययुगीन काळात शेवटचा सर्वात मोठ्ठा सम्राट आहे. त्यांनी इंग्रजांना सलो की पळो करून सोडले होते

२. (१८६७) स्वामी विवेकानंदांच्या शिष्या मार्गारेट नोबल ऊर्फ भगिनी निवेदिता यांचा जन्म

या आयरिश लेखिका, शिक्षिका, सामाजिक कार्यकर्त्या व स्वामी विवेकानंद यांच्या शिष्या होत्या

३. (१८९३) शंकर केशव कानेटकर उर्फ कवी गिरीश यांचा जन्म

साताऱ्यात जन्मलेल्या कानेटकरांनी फर्ग्युसन व विलिंग्डन या कॉलेजांतून अध्यापन केले. ते मुधोजी हायस्कूल, फलटण या शाळेचे प्राचार्य होते. त्यांनी अनेक प्रसिद्ध कविता फलटण मुक्कामी रचल्या आहेत. कवी गिरीश हे रविकिरण मंडळाचे एक प्रमुख सदस्य होते

कवी गिरीश यांचे ५ काव्यसंग्रह आहेत. त्याशिवाय त्यांनी चार स्वरचित खंडकाव्ये व टेनिसनच्या ’इनॉक आर्डेन’चा ’अनिकेत’ हा काव्यानुवाद केला. माधव ज्युलियन यांचे चरित्र त्यांनी लिहिले, तर रेव्हरंड ना.वा. टिळक यांच्या ख्रिस्तायनची प्रत संपादित केली

४. (१९००) जर्मन विचारवंत मॅक्स मुल्लर यांचे निधन

तुलनात्मक भाषाशास्त्र, जगातील धर्मांचा तुलनात्मक अभ्यास व संस्कृत भाषा यांविषयीं महत्त्वाचे कार्य आणि ॠग्वेदसंहितेचे संपादन या गोष्टी मॅक्समुल्लरच्या आयुष्यातील महत्त्वाची कामगिरी होय

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर