दिनविशेष २६ ऑक्टोबर
दिनविशेष
दि. २६ ऑक्टोबर
१. (१८९०) भारतीय पत्रकार, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे नेते आणि भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील कार्यकर्ते गणेश शंकर विद्यार्थी यांचा जन्म
असहकार चळवळ आणि भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील ते एक महत्त्वाचे व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी व्हिक्टर ह्यूगोच्या नाइन्टी-थ्री या कादंबरीचा अनुवाद केला होता आणि मुख्यतः त्यांना प्रताप या हिंदी भाषेतील वृत्तपत्राचे संस्थापक-संपादक म्हणून ओळखले जाते
२. (१९२१) मराठी कवी आणि काव्यसमीक्षक वासुदेव बळवंत पटवर्धन यांचे निधन
पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजात इंग्लिश शिकवणारे ते एक व्यासंगी प्राध्यापक होते. तेथे ते शेक्सपियर आणि बाउनिंग उत्तम शिकवत. मराठी भाषेचा माध्यमिक शिक्षणात, विद्यापीठांत सर्वत्र वाजवी हक्काने प्रवेश व्हायला हवा या न्यायमूर्ती रानड्यांनी चालविलेल्या सर्व चळवळीत वासुदेव बळवंत पटवर्धन अग्रभागी असत. पटवर्धन स्वतःही कवी होते. वसंत या टोपणनावाने त्यानी कविता लिहिल्या आहेत
शंकर काशिनाथ गर्गे ऊर्फ दिवाकर (१८८९-१९३१) यांनी मोनोलॉगसदृश जो नवा साहित्यप्रकार मराठीत आणला त्या प्रकाराला वा.ब पटवर्धनांनी ड्रॅमॅटिक शॅडो हे इंग्रजी आणि नाट्यछटा हे मराठी नाव सुचविले. दिवाकरांना नाट्यछटा लिहिण्याची प्रेरणा पटवर्धनांनीच दिली होती
३. (१९५४) नाट्य आणि चित्रपट अभिनेते, विनोदाचे अनभिषिक्त सम्राट अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे यांचा जन्म
मराठी चित्रपट सृष्टीत त्यांनी अतुलनीय योगदान दिले. त्यांना मराठीतील उत्कृष्ट विनोदवीर म्हणून ओळखले जाते
४. (१९९१) भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील स्वातंत्र्यसैनिक आणि लेखक, संपादक अनंत काशिनाथ भालेराव यांचे निधन
हैदराबाद मुक्तिसंग्राम लढ्यात महत्त्वाची भूमिका बजावल्यानंतर अनंतरावांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील सत्याग्रहातही सहभाग घेतला. याबद्दल सक्तमजुरीच्या आणि तुरुंगावासाच्या शिक्षाही भोगल्या. स्वातंत्र्योत्तर काळात औरंगाबादहून प्रसिद्ध होत असलेल्या दैनिक मराठवाडातून त्यांनी सातत्याने समाजहिताची, विकासाची भूमिका घेत लेखन केले. विकासासाठी जनतेने केलेल्या आंदोलनांत आणि पत्रकार आणि साहित्यिकांची एक पिढी घडवण्यात भालेराव यांनी भूमिका बजावली
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment