दिनविशेष २५ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. २५ ऑक्टोबर

१. (१८८१) स्पॅनिश चित्रकार आणि शिल्पकार पाब्लो पिकासो यांचा जन्म

पाब्लो पिकासो हे युरोप खंडातील स्पेन देशातील प्रख्यात चित्रकार आणि शिल्पकार होते. पिकासो हे चित्रकलेतील त्यांच्या अभिनव शैलीसाठी आणि अनन्यसाधारण विचारांसाठी प्रसिद्ध होते. मॉडर्निझम, सुररिअलीझम ह्यांसारख्या चित्रकलेतील वेगवेगळ्या विचारप्रवाहांचा मिलाफ पिकासोच्या चित्रांमधून दिसून येतो. क्युबिझम ही चित्रशैली निर्माण करण्याचे श्रेय पिकासोकडे जाते

२. (१९५५) शास्त्रीय गायक, पं. दत्तात्रय विष्णू ऊर्फ बापूराव पलुसकर यांचे निधन

ते हिंदुस्थानी शास्त्रीय गायन शैलीतले प्रसिद्ध गायक होते. पायोजी मैने रामरतन धन पायो, ठुमक चलत रामचंद्र, चलो मन गंगा जमुनातीर ही त्यांनी गायलेली काही अत्यंत लोकप्रिय गाणी आहेत. गायनाचार्य पं. विष्णू दिगंबर पलुसकर यांचे ते चिरंजीव होत

३. (१९८०) शायर व गीतकार अब्दूल हयी ऊर्फ साहिर लुधियानवी यांचे निधन

ते एक प्रसिद्ध कवी आणि हिंदी चित्रपट गीतकार होते. साहिर यांनी या प्रेमगीतात संपूर्ण निसर्ग उभा केला होता. या गीताने चित्रपटसृष्टीला साहिर यांच्या प्रतिभेची चुणूक दाखवून दिली. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. हे गीत होते - 'ठंडी हवाएँ लहराके आयें, ऋतु है जवाँ, तुम हो यहाँ, कैसे भुलायें...'

हिंदी चित्रपटगीतांच्या क्षेत्रात साहिर यांनी दिलेल्या ऐतिहासिक योगदानामध्ये 'हम दोनो'ची ही गीते येतात. - 'अल्लाह तेरो नाम... कभी खुद पे कभी हालात पे... तसंच, मै जिंदगी का साथ निभाता चला गया...' अशी एकापेक्षा एक गाणी सांगता येतील. मात्र, 'अभीना जाओ छोड कर...' यातील आर्तता शब्दांत पकडणे फक्त साहिरनाच शक्य होते

४. (२००९) मराठी चित्रपट व रंगभूमी अभिनेते चित्तरंजन कोल्हटकर यांचे निधन

ते मराठी नाट्य-अभिनेते, चित्रपट अभिनेते होते. सुमारे सहा दशकं रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रात त्यांची कारकीर्द आहे. आग्य्राहून सुटका, बेबंदशाही, पद्मिनी, इथे ओशाळला मृत्यू, नटसम्राट या ऐतिहासिक मराठी नाटकांतील भूमिका त्यांनी अजरामर केल्या. भावबंधनप्रमाणेच एकच प्याला, स्वामिनी, दुरिताचे तिमिर जावो, गारंबीचा बापू, पंडितराज जगन्नाथ, अश्रूंची झाली फुले इ. नाटकांमधील त्यांच्या भूमिका प्रसिद्ध आहेत


५. (२००३) कृतीशील विचारवंत आणि तत्त्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचे निधन

ते मराठी तत्त्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर