दिनविशेष १९ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. १९ ऑक्टोबर

१. (१९०२) कथालेखक दिवाकर कृष्णा केळकर तथा दिवाकर कृष्ण यांचा जन्म 

दिवाकर कृष्ण यांनी १९२२ पासून दिवाकरांनी मनोरंजन मासिकातून कथालेखन केले. १९२२ मध्ये मासिक मनोरंजनाच्या एका अंकातून 'अंगणातला पोपट' ही त्यांची पहिली कथा प्रसिद्ध झाली. त्यानंतर त्यांनी लिहिलेल्या कथांचा संग्रह समाधी व इतर सहा गोष्टी ह्या नावाने प्रसिद्ध झाला. त्यानंतर रूपगर्विता आणि इतर गोष्टी हा कथासंग्रह प्रकाशित झाला

२. (१९२०) कृतीशील विचारवंत आणि तत्वज्ञ पांडुरंगशास्त्री आठवले यांचा जन्म

ते मराठी तत्वज्ञ होते. ते स्वाध्याय परिवाराचे प्रणेते, संस्थापक होते. त्यांना रेमन मॅगसेसे, टेंम्पलटेंट पुरस्कार, महात्मा गांधी पुरस्कार, लोकमान्य टिळक पुरस्कार, पद्मविभूषण, अशा विविध पुरस्काराने गौरवण्यात आले

३. (१९३६) आपल्या मनातल्या भावनेला काव्यसौंदर्याची जोड देणारे ख्यातनाम गीतकार शांताराम नांदगावकर यांचा जन्म

ते मराठी गीतकार, कवी होते. त्यांनी अनेक भावगीते आणि काही मराठी चित्रपटांसाठी गाणी लिहिली. अशी ही बनवाबनवीअष्टविनायक, गंमत जंमत, तू सुखकर्ता, धुमधडाका, नवरी मिळे नवऱ्याला, पैजेचा विडा यांसारख्या मराठी चित्रपटांसाठी नांदगावकरांनी गीतलेखन केले

'ससा तो ससा', 'दोन बोक्यांनी' अशी बाल मनावर अधिराज्य गाजवणारी गाणी लिहणारे कवी. तसेच 'दाटून कंठ येतो’, 'हृदयी वसंत फुलताना’, ‘प्रिये जगू कसा तुझ्याविना मी राणी गं’, 'बिलनशी नागीण निघाली नागोबा डुलाया लागला' यांसारख्या अनेक लोकप्रिय गाण्यांचे ते गीतकार होते. बालगीत, भावगीत, लोकगीतेही त्यांनी लिहिली. 'अष्टविनायक महिमा' हे त्यांचे गाणे विशेष गाजले. शिवसेना पक्षातर्फे ते विधानपरिषदेचे सदस्यही होते

४. (१९५४) चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, मराठीतील समर्थ लेखिका, पत्रकार, सूत्रसंचालिका प्रिया तेंडुलकर यांचा जन्म  


प्रिया तेंडुलकर या नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. ‘ती फुलराणी’ आणि ‘एक हट्टी मुलगी’, गिधाडे, या नाटकांत त्यांनी काम केले. दुरदर्शनवरील 'रजनी' ही त्यांची मालिका फार गाजली. त्यामुळे त्यांना 'रजनी' ही नवीन ओळख मिळाली. भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणूनही त्यांची ओळख

गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, माहेरची माणसे, थोरली जाऊ, राणीनं डाव जिंकला, देवता हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट. त्यांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' हे पुस्तक प्रसिध्द आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर