दिनविशेष १४ ऑक्टोबर

दिनविशेष

दि. १४ ऑक्टोबर

* धम्मचक्र प्रवर्तन दिन

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या सुमारे ५,००,००० अनुयायांसह दीक्षाभूमी, नागपूर येथे बौद्ध धर्मात प्रवेश केला. विजयादशमीला १४ ऑक्टोबर १९५६ रोजी दीक्षाभूमी, नागपूर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या अनुयायांसोबत नवयान बौद्ध धर्मात प्रवेश केला

* जागतिक मानक दिन

जागतिक मानक दिन दरवर्षी १४ ऑक्टोबर रोजी जगभरात साजरा केला जातो. जागतिक स्तरावर हा दिवस साजरा करण्याचा मुख्य उद्देश ग्राहक, नियामक आणि उद्योगांमध्ये जागतिक अर्थव्यवस्थेतील मानकीकरणाबाबत जागरूकता पसरवणे हा आहे. हा दिवस पहिल्यांदा १९७० मध्ये आयोजित करण्यात आला होता. ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड्स ही देखील भारतातील राष्ट्रीय मानके ठरवणारी संस्था आहे. ज्याचे पूर्वीचे नाव भारतीय मानक संस्था होते. त्याची स्थापना १९४७ मध्ये झाली

१. (१९४३) महाराष्ट्रातील एक विचारवंत, व्याख्याते आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक, लेखक डॉ. आ. ह. साळुंखे यांचा जन्म

डॉ. आ. ह. साळुंखे यांनी मराठी विश्वकोशात तुलनात्मक धर्मशास्त्र, संस्कृत इत्यादी विषयांत १०० हून अधिक लेख लिहिले आहेत. ४ ऑगस्ट २००९ ला महाराष्ट्र सरकारने डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे सांस्कृतिक धोरण ठरवण्यासाठी समिती नेमली होती

प्रसिद्ध ग्रंथसंपदा - 
● पुरंदरेंची इतिहासद्रोही बखर
● विद्रोही तुकाराम
● विद्रोही तुकाराम : समीक्षेची समीक्षा
● धर्म की धर्मापलीकडे ?

२. (१९५३) समाजस्वास्थ्यासाठी संततिनियमन आणि लैंगिक शिक्षण यांसाठी बुद्धिवादी विचारप्रवर्तन व प्रत्यक्ष कार्य करणारे विचारवंत, रघुनाथ धोंडो तथा र. धों. कर्वे यांचे निधन

हे गणिताचे प्राध्यापक आणि महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक होते. हे धोंडो केशव कर्वे यांचे ज्येष्ठ पुत्र होत, महाराष्टात संततिनियमन या नासक्या समजल्या जाणाऱ्या गोष्टीला कुठलीही सामजिक मान्यता नव्हती. अशा काळामध्ये सामाजिक सुधारणांचा आग्रह धरून समाजामध्ये संततिनियमन होणे आवश्यक आहे, आणि त्यासंबंधी कायदा करून त्याचा उपयोग केला जावा, अशा प्रकारचे मत र.धों कर्वे यांनी मांडले. 'समाजस्वास्थ्य' या नावाने त्यांनी मासिक सुरू करून परिवर्तनाला दिशा देण्याचा प्रयत्न केला

३. (१९९४) इतिहासकार, विचारवंत, संशोधक, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक, ’गॅझेटियर्स’चे संपादक असे विविधांगी पैलू असलेले व्यक्तिमत्त्व सेतू माधवराव पगडी यांचे निधन

इतिहासाचे संशोधक म्हणून ख्याती मिळवण्यासोबतच, सेतुमाधव पगडी यांनी विपुल प्रमाणात स्फुट लेखन व ग्रंथलेखन केले. उर्दूचा गाढा आभ्यास असल्यामुळे आशयाला धक्का न लावता इकबालच्या उत्तम व रसभरीत कविता व फिरदौसीचा जाहीरनामा त्यांनी मराठीत आणला

त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे. गोंडी व कलामी या आदिवासींच्या बोलींवर त्यांनी लिखाण केले. ’जीवनसेतू’ हे त्यांचे आत्मचरित्र प्रसिद्ध आहे

४. (२०१३) माजी केंद्रीय मंत्री व सामाजिक कार्यकर्ते, वनराई या संस्थेचे संस्थापक मोहन धारिया यांचे निधन

मोहन धारिया यांनी देशाच्या स्वातंत्र्यप्राप्तीसाठी 'लोकसेना' नावाची संस्था सुरू केली. आपल्या नेतृत्व कौशल्याच्या जोरावर त्यांनी शेकडो तरुणांना संघटित केले. शिवाय वेगवेगळ्या संघटनांना एकत्र आणून मोहन धारिया यांनी पुण्यात 'नॅशनल लेबर सेंटर'ची स्थापना केली

मोहन धारिया यांनी इ.स. १९८३ च्या सुमारास 'वनराई' या संस्थेची स्थापना केली. या संस्थेचे उद्दिष्ट लोकसहभागातून विकास साधणे हे होते. या संस्थेतर्फे सुमारे २.५ कोटीपेक्षा जास्त रोपांचे शेतकऱ्यांना वाटप करण्यात आले. ते अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये कार्यरत होते व तरुणांचे प्रेरणास्थान होते. भारतातील सुमारे १७.५ हेक्टर जमिनांच्या पुनरुज्जीवनासाठी त्यांनी सरकारशी सतत पाठपुरावा केला. लोकसहभागातून त्यांनी जवळपास तीन लाख 'वनराई बंधारे' बांधले. त्यांद्वारे, जमिनीत पाण्याचे पुनर्भरण शक्य झाले. त्यामुळे अनेक गावांना टॅंकरने पाणीपुरवढा करायची गरज उरली नाही. हे कार्य करताना त्यांचावेगवेगळ्या सामाजिक्संस्थांशी घनिष्ट संबंध आला. साधना, भारतीय शिक्षण संस्था, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, जनसेवा अशा विविध संस्थांचे ते विश्वस्त होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर