९. #JAWAN #जवान चित्रपटाच्या निमित्ताने...

#जवान चित्रपटाच्या निमित्ताने...

आज पर्यंत मी माझ्या जीवनात ४०० ते ५०० हून अधिक मराठी, हिंदी, इंग्रजी, दक्षिण भारतीय चित्रपट, चित्रपटगृहात जाऊन पाहिले आहेत. पण आज जवान चित्रपट पाहायला आलेल्या लोकांचा उत्साह काही औरच होता. हा असा उत्साह मी गेल्या १५ वर्षात कधी पाहला नाही. चित्रपट प्रदर्शित होण्याची वेळ (भारत जोडो यात्रेची वर्षपूर्ती, लोकसभा निवडणुकीच्या थोडे अगोदर) त्याचा आशय (संवाद आणि कथा) व त्यात अभिनय करत असलेला मुख्य कलाकार (शाहरुख खान) यांचा आजच्या सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक परिस्थितीशी असलेला परस्पर संबंध एवढा जुळून आला आहे की लोकांना त्याबद्दल आपुलकी, उत्साह आहे.

त्यामुळे लोक त्याला भरभरून प्रतिसाद देत आहेत. भारतातील लोकांना भेडसावणाऱ्या प्रमुख समस्यांवर यात भाष्य केले आहे. आजच्या काळात सरकार लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असताना सरकारला थेट जाब विचारण्याचे धाडस चित्रपटात करण्यात आले आहे. चित्रपट शेतकरी, आरोग्य व्यवस्था, सैनिक, सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न यांच्याबद्दल भाष्य करतो. चित्रपट हा तसा भारतीय नागरिकांचा जिव्हाळ्याचा विषय. पण मधल्या ७ ते ८ वर्षात सरकारचे प्रचारपट लोकांवर थोपवले जात होते. ते सोडून लोकांची बाजू मांडणारा आणि सरकारला जाब विचारणारा चित्रपट म्हणूनही लोक त्याला उस्फुर्त प्रतिसाद देत आहेत. जुनी हिंदी चित्रपटसृष्टी (बॉलीवूड) पुन्हा एकदा त्याच्या रंगात येत आहे याबद्दल माझ्यासारख्या चित्रपट रसिकाला फार आनंद आहे.

हा चित्रपट पाहत असताना मला जुने दिवस आठवले. चित्रपट ब्लॅक ने पाहण्याचे दिवस होते ते. तो पण काय काळ होता... आतासारखे तेव्हा ऑनलाइन तिकीटाची सोय नव्हती. चित्रपटाच्या तिकीटासाठी चित्रपटाच्या शो च्या बराच वेळ अगोदर जाऊन तिकिट मिळवायचा प्रयत्न करायला लागायचा. आणि जर तिकीट मिळालेचं नाही. तर ब्लॅक ने तिकीट घेऊन चित्रटप बघायला लागायचा... चित्रपट ब्लॅक ने घेऊन चित्रपट पाहिल्याचा आनंद तर वेगळाचं. चित्रपट हाऊसफुल्ल आहे आणि तिकीट ब्लॅक ने चाललयं यावरूनच चित्रपटाची किती चलती आहे हे ठरवलं जाई. आज जर तशी परिस्थिती असती तर तिकीटाचे कसे केले असते... असं मनोमन विचार करून मनं भूतकाळात रमून जातं... आणि भूतकाळातील चित्रपट विश्वाच्या गुलाबी आठवणीत न्हाऊन जातं...


विशाल पवार.

दि. ८ सप्टेंबर २०२३

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर