दिनविशेष १० सप्टेंबर
दिनविशेष
दि. १० सप्टेंबर
* जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन
जगभरात आत्महत्येच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत आहे. लोकांमध्ये नैराश्य सतत वाढत आहे, त्यामुळे काही लोक आत्महत्येसारखे हृदयद्रावक पाऊल उचलतात. आज आत्महत्या आणि मानसिक आरोग्याबाबत समाजात जागरूकता वाढवणे गरजेचे आहे. अशा सामाजिक विषयांना प्रोत्साहन देण्यासाठी आणि आत्महत्येबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी १० सप्टेंबर रोजी जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन साजरा केला जातो. याचा उद्देश आत्महत्या रोखणे आणि त्याबद्दल जागरूकता निर्माण करणे हा आहे
१. (१८७२) भारतातील पहिले कसोटी क्रिकेटपटू , महाराजा के. एस. रणजितसिंह यांचा जन्म
भारतातील राष्ट्रीय पातळीवरील मानाची क्रिकेट स्पर्धा समजली जाणाऱ्या रणजी करंडक स्पर्धेला रणजितसिंह यांचे नाव देण्यात आले आहे
२. (१८८७) स्वातंत्र्यसैनिक आणि स्वतंत्र भारताचे दुसरे गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांचा जन्म
पंत हे उत्तर प्रदेशाचे प्रथम मुख्यमंत्री आणि भारताचे दुसरे गृहमंत्री होते. जमिनदारी पद्धत समाप्त करण्यात व कूळ कायदा अस्तित्वात आणण्यात त्यांचे मुख्य योगदान होते. अल्पसंख्यकांच्या समस्या सोडविण्यासाठी त्यांनी कुमाऊ परिषदेची स्थापना केली
३. (१९४४) क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांची सातारा जेल मधून क्रांतिकारी उडी, उंचच उंच काळ्या दगडी भिंती वरून सशस्त्र इंग्रज सैन्याचा पारा चुकवून त्यांनी उडी मारली
३. (१९४८) नाट्य चित्रपट अभिनेत्री भक्ती बर्वे यांचा जन्म
पु. ल. देशपांडे यांच्या 'ती फुलराणी' या नाटकातील भक्ती बर्वे यांची प्रमुख भूमिका होती. फुलराणी चे ११११ हून अधिक प्रयोग झाले. 'आई रिटायर होतेय' या नाटकात भक्ती बर्वे यांनी साकारलेली आईची भूमिकाही खूप गाजली
शालेय जीवनात 'लिटल थिएटर' मध्ये नाटकातून काम करून त्यांनी रंगभूमीवर पाऊल ठेवले. आकाशवाणी व दूरदर्शनवर निवेदिका म्हणून त्यांनी काम केले
४. (१९६५) अभिनेते अतुल कुलकर्णी याचा जन्म
हे चित्रपट व नाट्य अभिनेते आहेत. त्यांना हे राम चित्रपटातील श्रीराम अभ्यंकर ही व्यक्तिरेखेच्या निरुपणाबद्दल राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. याशिवाय पेज थ्री व रंग दे बसंती या चित्रपटांतील त्यांच्या भुमिकांनाही चिकित्सकांकडून दाद मिळाली. विविध मराठी चित्रपटातही त्यांनी काम केले आहे. मातीमाय हा त्यांचा चित्रपट टोरोंटो चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झाला. रंग दे बसंती या चित्रपटामुळे त्यांना बरीच प्रसिद्धी लाभली
५. (१९७२) अभिनेता अनुराग कश्यप याचा जन्म
हे हिंदी चित्रपट दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथालेखक आहेत. कश्यप यांचा प्रथम चित्रपट पांच हा होता. दिग्दर्शक म्हणून त्यांचे ब्लॅक फ्रायडे, नो स्मोकींग, देव डी, गुलाल, दॅट गर्ल ईन यलो बुट्स आणि गॅंग्स ऑफ वासेपूर हे चित्रपट प्रसिद्ध आहेत. फिल्मफेअर पुरस्कारविजेता चित्रपट सत्या आणि ऑस्करसाठी नामांकित झालेला वॉटर या चित्रपटांसाठी त्यानी पटकथालेखन केले होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment