दिनविशेष १९ सप्टेंबर
दिनविशेष
दि. १९ सप्टेंबर
१. (१९२२) मराठी लेखक, पत्रकार गणेश वासुदेव बेहरे यांचा जन्म
ते मराठी लेखक आणि झुंझार पत्रकार होते. पुण्याहून प्रसिद्ध होणाऱ्या सोबत नावाच्या साप्ताहिकाचे ते संस्थापक आणि संपादक होते. त्यांचे काही लिखाण अनिल विश्वास या टोपण नावाने प्रकाशित झाले आहे. त्यांची त्या साप्ताहिकात कटाक्ष आणि गवाक्ष ही सदरे लोकप्रिय होती. बेहेरे यांनी सुमारे ३० पुस्तके लिहिली आहेत
२. (१९२७) हिंदी साहित्यकार कुंवर नारायण यांचा जन्म
इ.स. १९५० सालापासून कुंवर नारायण यांनी लिहायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांचे नाव हिंदीतील नवकाव्याशी जोडले गेले. कवितेबरोबरच त्यांनी विभिन्न साहित्यिक, वैचारिक आणि सांस्कृतिक विषयांवरही लेखन केले. त्यांच्या अनेक साहित्यकृतींचे भारतीय व विदेशी भांषांमध्ये अनुवाद झाले आहेत
३. (१९३६) हिंदुस्थानी संगीताचे प्रसारक, संशोधक, गांधर्व महाविद्यालयाचे संस्थापक पं. विष्णु नारायण भातखंडे यांचे निधन
ते हिंदुस्तानी संगीताचे संशोधक, संगीतकार, गायक होते. त्यांनी हिंदुस्तानी शास्त्रीय संगीताच्या वर्गीकरणाची थाट पद्धत विकसित केली
४ . (१९६५) अंतराळवीर सुनिता विल्यम्स यांचा जन्म
या भारतीय वंशाच्या अमेरिकन नौसेनेतील अधिकारी व नासा अंतराळयात्री आहेत. त्यांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या १४ व्या मोहिमेवर व १५ व्या मोहिमेवर पाठवण्यात आले. महिला अंतराळयात्रीने केलेल्या आजवरच्या सर्वाधिक प्रदीर्घ अंतराळयात्रेचा (१९५ दिवस) विक्रम त्यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्यांच्या नावावर सगळ्यात जास्त वेळा (७ वेळा) आणि जास्त वेळ (५० तास, ४० मिनिटे) अंतराळात चाललेली महिला असण्याचा विक्रम आहे
५. (२००२) चित्रपट, नाट्य आणि दूरचित्रवाणी अभिनेत्री, मराठीतील समर्थ लेखिका, पत्रकार, सूत्रसंचालिका, सर्वांची आवडती 'रजनी', प्रिया तेंडुलकर यांचे निधन
प्रिया तेंडुलकर या नाटककार विजय तेंडुलकर यांच्या कन्या. ‘ती फुलराणी’ आणि ‘एक हट्टी मुलगी’, गिधाडे, या नाटकांत त्यांनी काम केले
दुरदर्शनवरील 'रजनी' ही त्यांची मालिका फार गाजली. त्यामुळे त्यांना 'रजनी' ही नवीन ओळख मिळाली. भारतातील पहिल्या टीव्ही-स्टार म्हणूनही त्यांची ओळख
गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, माहेरची माणसे, थोरली जाऊ, राणीनं डाव जिंकला, देवता हे त्यांचे काही प्रमुख चित्रपट
६. (२००७) प्रसिद्ध मराठी संगीतकार व कवी दत्ता डावजेकर यांचे निधन
ते मराठीतील संगीतकार होते. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांना 'डीडी' या टोपणनावानेही ओळखले जाई. इ.स. १९४१ सालापासून त्यांनी चित्रपटांना व मराठी भावगीतांना संगीत दिले होते. त्यांनी ६० हून अधिक चित्रपट व १२ नाटकांना संगीत दिले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment