दिनविशेष ११ सप्टेंबर

दि. ११ सप्टेंबर २०२१

१. (१८९३) स्वामी विवेकानंद यांनी अमेरिकेतील शिकागो येथील जागतिक सर्वधर्म परिषदेत गाजलेलं भाषण केलं

या भाषणानं विवेकानंदांबरोबरच भारतालाही जगात एक वेगळी ओळख मिळवून दिली होती. त्यातील थोडा सारांश

अमेरिकेतील माझ्या बंधूंनो, आणि भगिनींनो

आपल्या प्रेमळ व उत्स्फूर्त स्वागतानं माझं हृदय भरून आलं आहे. या स्वागताबद्दल मी जगातील सर्वात प्राचीन परंपरेच्या वतीनं आपले आभार मानतो. सर्व धर्मांची जननी असलेल्या, सर्व जाती, पंथांच्या लाखो, करोडो हिदूंच्या वतीनं आपल्याला मन:पूर्वक धन्यवाद देतो. पूर्वेकडील देशांकडून सहिष्णुतेचा विचार जगाला मिळाला आहे, असं या व्यासपीठावरून सांगणाऱ्या वक्त्यांचेही आभार मानतो

२. (१८९५) भूदान चळवळीचे जनक, आचार्य विनोबा भावे यांचा जन्म 

विनोबा भावे नावाने लोकप्रिय, हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक व भूदान चळवळीचे प्रणेते होते. महात्मा गांधींनी १९४० मध्ये 'वैयक्तिक सत्याग्रह' पुकारला, त्यावेळी पहिले सत्याग्रही म्हणून त्यांनी भावेंची निवड केली. ब्रिटिश राजविरोधी या आंदोलनाचे पर्यवसान १९४२ मध्ये 'छोडो भारत' आंदोलनात झाले. भावे पुढे सर्वोदयी नेते म्हणून प्रसिद्ध झाले


३. (१९०१) साहित्यिक आत्माराव रावजी देशपांडे तथा कवी अनिल यांचा जन्म

कवी अनिल यांना मुक्तछंद ह्या काव्यप्रकाराचे प्रवर्तक समजले जाते. तसेच दशपदी - १० चरणांची कविता - हा काव्यप्रकार अनिलांनी सुरू केला. फुलवात, दशपदी, भग्नमूर्ती, हे त्यांचे गाजलेले काव्यसंग्रह. १९५८ च्या मालवण साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते

४. (१९८७) हिंदी कवियत्री, स्वातंत्र्यसैनिक, शिक्षणतज्ज्ञ महादेवी वर्मा यांचे निधन

त्या हिंदीतील अत्यंत प्रतिभावान कवयित्री होत्या. त्यांना हिंदी साहित्य जगतातील छायावादी युगाच्या चार प्रमुख स्तंभांपैकी एक समजले जाते. आधुनिक हिंदीच्या समर्थ कवीं असल्यामुळे त्यांना 'आधुनिक मीरा' पण म्हंटले जाते. कवी निराला ह्यांनी तर त्यांचा हिंदीच्या विशाल मंदिरातील सरस्वती असा उल्लेख केला आहे

५. (२०२०) ख्यातनाम नेते, राजकारणी व सामाजिक  कार्यकर्ते स्वामी अग्निवेश यांचे निधन

स्वामी अग्निवेश सामाजिक मुद्दयांवर आपले मत निर्भिडपणे मांडण्यात प्रसिद्ध होते. त्यांनी १९७० मध्ये आर्य सभा नावाचा राजकीय पक्ष स्थापन केला होता. सन १९७७ मध्ये ते हरयाणा विधानसभेवर आमदार म्हणून निवडून गेले. त्यानंतर ते हरयाणाचे शिक्षणमंत्री झाले. सन १९८१ मध्ये त्यांनी बंधुआ मुक्ती मोर्चा नावाची संघटना स्थापन केली

#vishalinc5 #satata #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर