दिनविशेष १४ सप्टेंबर

दिनविशेष

दि. १४ सप्टेंबर

* हिंदी दिन

१४ सप्टेंबर १९४९ रोजी घटना समितीने भारतीय संघराज्याच्या राजभाषेत ऐतिहासिक निर्णय घेऊन हिंदी भाषेला राजभाषेचा सन्मान दिला. त्यामुळे दरवर्षी १४ सप्टेंबर हा दिवस 'हिंदी दिन' म्हणून साजरा केला जातो. राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये सध्या बावीस भाषांना राष्ट्रभाषा म्हणून दर्जा देण्यात आला आहे


१. (१९३२) चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते काशीनाथ घाणेकर यांचा जन्म

ते मराठी नाट्य अभिनेते व हिंदी-मराठी चित्रपट अभिनेते होते. सन १९६० ते १९९० या काळातले ते मराठीतले पहिले सुपर स्टार होते. वसंत कानेटकर यांनी लिहिलेल्या 'रायगडाला जेव्हा जाग येते' या नाटकातल्या संभाजींच्या भूमिकेनंतर घाणेकरांना अफाट लोकप्रियता लाभली. तेवढीच ‘अश्रूंची झाली फुले’ मधील त्यांची 'लाल्या'ची भूमिका गाजली. या नाटकाशिवाय त्यांनी इतर अनेक नाटकांमध्ये उत्तम अभिनय केला. रंगमंचावरील एंट्रीला टाळ्या-शिट्ट्या घेण्याची पद्धत यांच्या अभिनयाच्या काळातच सुरू झाली

२. (२०११) कुस्तीगीर आणि प्रशिक्षक हरिशचंद्र बिराजदार यांचे निधन

हे पहिलवानी कुस्ती खेळणारे मराठी कुस्तीगीर व कुस्ती-प्रशिक्षक होते. स्कॉटलंड येथे झालेल्या इ.स. १९७० सालातल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांमध्ये त्यांनी सुवर्णपदक पटकावले होते, तर इ.स. १९७२ साली त्यांनी भारतातील राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत अजिंक्यपद जिंकून रुस्तम-ए-हिंद किताब मिळवला होता. खेळाडू म्हणून कारकीर्द संपल्यावर ते कुस्ती-प्रशिक्षक म्हणून काम करत होते

#vishalinc5 #satara #सातारा 

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर