दिनविशेष ८ ऑगस्ट

दिनविशेष

दि. ०८ ऑगस्ट

१. (१९१५) ख्यातनाम हिंदी साहित्यिक भीष्म सहानी यांचा जन्म

त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेल्या कथा गुलाल का खेल  ह्या नावाने प्रसिद्घ झालेल्या आहेत. तमस (१९७४) आणि बसंती (१९७८) ह्या त्यांच्या सर्वोत्कृष्ट कादंबऱ्या मानल्या जातात. तमस मध्ये पंजाबमध्ये झालेल्या जातीय दंगलीचे भीषण चित्र त्यांनी सूचक व प्रभावी शैलीत उभे केले आहे. ब्रिटिशांच्या ‘फोडा आणि झोडा’ ह्या नीतीवर, तसेच पंजाबमधल्या सर्वच जातींमधील बूर्झ्वा उच्चभ्रू मंडळींच्या संधिसाधू वृत्तीवर त्यांनी ह्या कादंबरीतून प्रखर प्रकाश टाकला आहे

२. (१९२६) साहित्यिक, चित्रपट कथालेखक, ग्रामीण कथालेखक, भारतीय चित्रपट महामंडळाचे संस्थापक सचिव आणि ’बालभारती’चे संपादक शंकर पाटील यांचा जन्म

त्यांचे ’चोरा मी वंदिले’, ’सागराचे पाणी’, ’सवाल’, ’बाजिंदा’ हे कथासंग्रह तसेच ’सरपंच’, ’इशारा’, ’घुंगरू’, ’कुलवंती’, ’बेईमान’, ’ललाट रेषा’, ’सुन माझी सावित्री’ या कादंबर्‍या हे गाजलेले साहित्य आहे

३. (१९३२) मराठी अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक, संवादलेखक विनोदाचे बादशाह दादाकोंडके यांचा आज जन्म

भोळ्या माणसाला त्यांनी चित्रपटसृष्टीच्या पडद्यावर अनेक काळ रेखाटलं. त्यांचा सोंगाड्या हा चित्रपट सुपरहिट ठरला होता. त्यांचे ९ चित्रपट त्या काळात २५ आठवड्यापेक्षा जास्त चालले. त्याची गिनीजबुक मध्ये नोंद आहे

४. (१९४२) गोवालिया टॅंक (आत्ताचे ऑगस्ट क्रांती मैदान) येथे महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात भारत छोडो आंदोलनाची सुरूवात

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर