दिनविशेष १ सप्टेंबर

दिनविशेष

दि. ०१ सप्टेंबर

१. (१८९३) प्राच्यविद्या संशोधक, कायदेपंडित काशिनाथ त्र्यंबक तेलंग यांचे निधन

ते ब्रिटिश भारतातील न्यायाधीश, मराठी लेखक-संपादक, व सुधारक होते. ते इ.स. १८८५-८९ या कालखंडात अखिल भारतीय काँग्रेसचे चिटणीस होते. इ.स. १८९२ साली ते मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू झाले

हिंदु कायद्यातील सुधारणांचा त्यांनी पुरस्कार केला. संमतीवयाच्या कायद्यास त्यांची मान्यता होती. स्त्रीशिक्षण, विधवा विवाह सुधारणांचे ते पुरस्कर्ते होते


२. (१९४७) लोकसभेचे माजी सभापती पी. ए. संगमा यांचा जन्म

३. (१९५६) भारतीय आयुर्विमा महामंडळा (LIC) ची स्थापना

Life Insurance Corporation of India) ही भारत देशातील सर्वात मोठी विमा कंपनी आहे. १९ जून १९५६ ला संसदेत एल आय सी कायदा संमत करून वरील कंपन्यांच्या एकत्रीकरणातून १ सप्टेंबर १९५६ ला एल आय सी ची स्थापना करण्यात आली. एलआयसीचे जीवन विम्याचे हप्ते हे उत्पन्नाचे प्रमुख साधन राहिले आहे

४. (२०१६) कवी शंकर बडे यांचे निधन

ते एक मराठी कवी होते. त्यांनी वऱ्हाडी बोलीभाषेतून कविता लिहिल्या. शंकर बडे हे वऱ्हाडी कविता आणि किस्स्यांचे तसेच एकपात्री कार्यक्रम करत. वऱ्हाडच्या ग्रामीण जीवनातील अनुभव त्यांनी आपल्या बॅरिस्टर गुलब्या या एकपात्री प्रयोगातून साकारले. महाराष्ट्रात त्या एकपात्रीचे तीनशेवर प्रयोग झाले

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर