दिनविशेष ४ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०४ ऑगस्ट
१. (१८९४) आपली शैली, रेखीवपणा व तंत्र या त्रिगुणांनी मराठी साहित्याला संपन्न करणारे साहित्यिक ना. सी. फडके यांचा जन्म
ना.सी. फडक्यांच्या कथा तंत्रशुद्धता, रेखीवपणा व डौलदार भाषा या त्रिगुणांनी नटलेल्या आहेत. आकर्षक प्रारंभ, कथेच्या मध्ये गुंतागुंत, अंती उकल आणि मग शेवट असे त्यांच्या लेखनाचे ठरावीक तंत्र आहे. तंत्रावर भर देणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत. तंत्राबरोबर फडक्यांची कथा रचना व भाषा या दृष्टीने प्रभावी आहे. एखाद्या प्रसंगाचे सुंदर शब्दचित्र रंगविणे व रेखीव व्यक्तिदर्शने घडविणे यात फडके निष्णात होते. फडक्यांच्या कथा भावोत्कट नसतात, त्या केवळ मनोरंजन करतात, मनावर कोणतेही संस्कार करत नाहीत, आशयाच्या बाबतीत उथळ असून शरीरनिष्ठ प्रणयाला प्राधान्य देणाऱ्या असतात असे आक्षेप फडक्यांच्या लिखाणावर टीकाकार घेत असत. असे काही कथांचे स्वरूप जरी असले तरी रचनेतील सफाई, मृदुमधुर भाषा, कथेमधले एखादे नाजूक रहस्य, विस्मयाच्या हुलकावण्या व वाचकांचे मनोरंजन करण्याचे सामर्थ्य हे फडक्यांचे कथांचे विशेष होते
फडके यांची तंत्रनिष्ठ कलादृष्टी त्यांच्या कथांतून मोठ्या प्रमाणात दिसते. त्यांच्या कथांचे पंचविसांहून अधिक संग्रह प्रकाशित झालेले असून, त्यांच्या काही प्रातिनिधिक कथा बावनकशी (१९६२) ह्या नावाने संग्रहित केलेल्या आहेत. अल्ला हो अकबर! (१९१७) ही त्यांची पहिली कादंबरी. मारी कोरेली ह्या इंग्रज कादंबरी लेखिकेच्या ’टेंपरल पॉवर’ ह्या कादंबरीच्या आधारे ती लिहिलेली आहे
२. (१९२९) जगभरातील संगीत रसिकांना आपल्या स्वरांनी मोहिनी घालणारे गायक, अभिनेता किशोर कुमार यांचा जन्म
किशोर कुमार हे भारतीय पार्श्वगायक, गायक, अभिनेता, गीतकार, संगीतकार, निर्माता, दिग्दर्शक आणि पटकथालेखक होते. हिंदी व्यतिरिक्त, त्यांनी बंगाली, मराठी, आसामी, गुजराती, कन्नड, भोजपुरी, मल्याळम, आणि उर्दू यासह अनेक भारतीय भाषांमध्ये गायन केले आहे
३. (१९६४) अभिनेते दिलीप प्रभावळकर यांचा जन्म
झपाटललेला या मराठी चित्रपटातील 'तात्या विंचू' आणि चौकट राजा व एक डाव भुताचा या चित्रपटात त्यांनी मुख्य भूमिका बजावली. प्रभावळकर यांना इ.स. २००६ च्या 'लगे रहो मुन्ना भाई' चित्रपटात महात्मा गांधी यांच्या भूमिकेसाठी त्यांना पुरस्कार मिळालेला आहे
४. (१९६१) अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचा जन्म
बराक ओबामांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध करून टाकणाऱ्या भाषणशैलीमुळे त्यांची तुलना मार्टिन ल्युथर किंग, जुनियर बरोबर केली जाते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment