दिनविशेष ३० ऑगस्ट

दिनविशेष

दि. ३० ऑगस्ट

* लघु उद्योग दिवस

आपल्या देशात लघु उद्योगांना चालना व प्रोत्साहन मिळावे यासाठी ३० ऑगस्ट हा दिवस हा लघु उद्योग दिवस म्हणून घोषित करण्यात आला आहे. लघु उद्योग हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा मानला जातो

उद्योग दिन हे लघु, मध्यम आणि मोठ्या उद्योगांना संतुलित वाढ प्रदान करणे तसेच राज्याच्या आर्थिक आरोग्याला चालना देण्यासाठी नवीन उद्योग उभारणीस मदत प्रदान करणे यांसाठी एक प्रभावी माध्यम आहे

१. (१९४७) मराठी कवी नारायण मुरलीधर गुप्ते उर्फ कवी बी यांचे निधन

त्यांनी सामाजिक, कौटुंबिक, ऐतिहासिक इ. नानाविध विषयांवर कविता केल्या. तसेच त्यांनी काही भाषांतरेही केली आहेत. 'प्रणयपत्रिका' ही त्यांची पहिली कविता. ‘वेडगाणे’ या कवितेपासून त्यांनी ‘बी’ हे टोपणनाव घेतले. 'चाफा बोलेना,चाफा चालेना' हे त्यांचे गीत खूप गाजले

'फुलांची ओंजळ' हा त्यांच्या ३८ कवितांचा संग्रह असून प्रस्तावना आचार्य अत्र्यांची आहे. पिकले पान हा त्यांचा दुसरा काव्यसंग्रह. त्यात ११ कविता होत्या. कवी बी यांनी एकून ४९ कविता लिहिल्या

(१९९८) स्वातंत्र्य सैनिक, निर्भिड पत्रकार नरूभाऊ लिमये यांचे निधन

स्वातंत्र्य सेनानी, जेष्ठ पत्रकार, अशी ओळख मिळवलेले नरहर वामन उर्फ नरूभाऊ लिमये यांचा जन्म साताऱ्यातील आणि ते यशवंतराव चव्हाण यांचे जवळचे सहकारी


३. (२०१५) भारतीय विद्वान लेखक एम. एम. कलबुर्गी यांचे निधन

ते प्रसिद्ध, विद्वान कन्नड साहित्यिक होते. २००६ साली त्यांना साहित्यिक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. ते विवेकवादी व साम्यवादी विचारवंत होते

४. (२०१६) मराठी विचारवंत, लेखक विनायक गजानन कानेटकर यांचे निधन

ते एक मराठी विचारवंत लेखक होते. कानिटकर यांनी अनेक ऐतिहासिक पुस्तकांचे लिखाण केले. त्यांचा जागतिक राजकारणाचा दांडगा व्यासंग होता. जगाच्या राजकारणात उलथापालथ घडवणाऱ्या अनेक महापुरुषांची चरित्रे त्यांनी ओघवत्या शैलीत शब्दबद्ध केली होती

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर