दिनविशेष २९ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २९ ऑगस्ट
* राष्ट्रीय क्रीडा दिन
राष्ट्रीय क्रीडा दिन हा विविध देशांमध्ये राष्ट्रीय क्रीडा संघ आणि त्या देशांच्या क्रीडा परंपरांचा सन्मान करण्यासाठी साजरा केला जातो. हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांच्या जयंती दिवशी २९ ऑगस्ट रोजी भारतात राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो
* आंतरराष्ट्रीय परमाणू चाचणी विरोधी दिवस
अणू चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिन म्हणून २९ ऑगस्ट हा दिवस २०१० सालापासून जागतिक स्तरावर साजरा करण्यात येत आहे. अण्वस्त्र चाचणी स्फोट किंवा इतर कोणत्याही आण्विक स्फोटांच्या परिणामांविषयी जागरूकता वाढविणे आणि अण्वस्त्रमुक्त जग निर्माण करण्यासाठी एक साधन म्हणून त्याचा वापर करण्याची विघातक पद्धती बंद करण्याची गरज पटवून देणे हे या दिवसाचे मुख्य उद्दिष्ट आहे. २ डिसेंबर २००९ रोजीच्या संयुक्त राष्ट्र आमसभेच्या ६४ व्या सत्रादरम्यान एक ठराव एकमताने स्विकारून २९ ऑगस्ट हा दिवस अण्वस्त्र चाचण्यांविरूद्धचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून जाहीर करण्यात आला
१. (१८८०) स्वातंत्र्यसैनिक लोकनायक माधव श्रीहरी तथा बापूजी अणे यांचा जन्म
ते एक शिक्षणतज्ज्ञ, स्वातंत्र्यसैनिक, राजकारणी आणि आधुनिक संस्कृत कवी होते. त्यांना 'लोकनायक बापूजी' म्हणजे 'लोकनेते आणि आदरणीय पिता' ही पदवी देखील बहाल करण्यात आली होती
२. (१९०५) भारतीय हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांचा जन्म
ते भारतीय हॉकीचे नावाजलेले खेळाडू होते. त्यांना जागतिक खेळ विश्वातील सर्वोत्कृष्ट हाॅकीचे खेळाडू म्हणून ओळखले जाते. त्यांना हाॅकीचे जादूगार म्हणून संबोधले जायचे. त्यांनी भारताला १९२८, १९३२ व १९३६ मध्ये ऑलिम्पिक सुवर्ण पदक मिळवून दिले. त्यांच्या काळात भारतीय संघ सर्वात शक्तिशाली संघ म्हणून ओळखला जायचा
३. (१९२३) इंग्लिश चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक रिचर्ड अटेनबरो यांचा जन्म
रिचर्ड अटेनबरो यांचा ‘गांधी’ हा नावाजलेला चित्रपट तयार केला होता. १९८३ च्या ऑस्कर पुरस्कार सोहळ्यात या चित्रपटाला दोन प्रकारात पुरस्कार मिळाले
४. (१९४७) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली घटना समितीची स्थापना करण्यात आली
५. (१९५८) आपल्या संगीत व नृत्याने अवघ्या जगाला मंत्रमुग्ध करणारे, सर्वांचे लाडके, आंतराष्ट्रीय ख्यातीचे पॉपस्टार 'मायकेल जॅक्सन' यांचा जन्म
ते अमेरिकन गायक, संगीतकार, नर्तक आणि अभिनेते होते. याला पॉपचा राजा असे संबोधले जात असे
५. (१९६९) लोकशाहीर मेहबूब शाहीर शेख यांचे निधन
आपल्या रचना रसाळपणे बुलंद आवाजात गात त्यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा यशस्वी प्रचार केला. स्वरचित आणि इतरांचीही कवने ते प्रभावीपणे पेश करीत. गोवामुक्ति आंदोलनातही त्यांनी मोठे योगदान दिले. चिनी व पाकिस्तानी आक्रमणांच्या वेळी आपल्या शाहिरीने त्यांनी लाखो रूपयांचा निधी देशासाठी गोळा केला
उपेक्षित समाजाच्या उद्धारासाठी वाणी, लेखणीचा यज्ञ त्यांनी मांडला. त्यांच्या शाहिरीत लावणी, पोवाडे, गीते, लोकनाट्ये इत्यादींचा समावेश होता. जनसमुदायाला भारून टाकण्याचे प्रभावी अंगभूत कौशल्य त्यांच्याजवळ होते. त्यांची लेखणी जिवंत, ज्वलंत आणि हृदये प्रदीप्त करणारी होती. प्रसार आणि प्रचारकार्यात या गुणांचा त्यांनी पुरेपूर उपयोग केला
६. (१९९७) नेटफ्लिक्स कंपनीची स्थापना
आजच्याच दिवशी आंतरजालावर करमणुकीच्या आगळ्यावेगळ्या युगाची सुरुवात झाली होती. आजच्या घडीला जगभरात एक वापरकर्ता सरासरी महिन्याला ४७ तास नेटफ्लिक्सवर उपलब्ध असलेले कार्यक्रम पाहतो. नेटफ्लिक्सची स्थापना एक डिव्हीडी भाड्याने देणारी कंपनी म्हणून झाली होती. गल्लीच्या कोपऱ्यावर असते तसे डीव्हीडीचे दुकान म्हणून नव्हे तर प्रॉपर एक मोठ्ठी कंपनी म्हणून
७. (२००८) मराठी, हिंदी चित्रपट अभिनेत्री जयश्री गडकर यांचे निधन
जयश्री गडकर यांनी त्यांच्या कारकिर्दीत २५० पेक्षा ज्यास्त चित्रपटात काम केले. जयश्री गडकर यांना मानिनी, वैंजयंता, सवाल माझा ऐका व साधी माणसं या चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. जयश्री गडकर यांचे इतर चित्रपट एक गाव बारा भानगडी, दिसतं तसं नसतं, सवाल माझा ऐका, पाटलाची सून, सून लाडकी या घरची, साधी माणस
७. (२०२१) ज्येष्ठ पत्रकार, नाटककार, लेखक जयंत पवार यांचे निधन
ते एक पत्रकार, मराठी नाटककार आणि नाट्यसमीक्षक आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेने घेतलेल्या नाट्यलेखन स्पर्धेत ‘काय डेंजर वारा सुटलाय’ या नाटकासाठी जयंत पवार यांना सर्वोत्कृष्ट लेखनाचे प्रथम पारितोषिक मिळाले. जयंत पवार यांना २०१२ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार त्यांच्या ’फिनिक्सच्या राखेतून उठला मोर’ या कथासंग्रहासाठी मिळाला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment