दिनविशेष २७ ऑगस्ट
दिनविशेष
दि. २७ ऑगस्ट
१. (१९१०) इतिहास संशोधक व साहित्यिक सेतुमाधवराव श्रीनिवास पगडी यांचा जन्म
ते इतिहाससंशोधक, विचारवंत, लेखक, वक्ते, तत्त्वचिंतक, समीक्षक, इतिहासाचे भाष्यकार, कार्यक्षम मुलकी अधिकारी, प्रशासक आणि महाराष्ट्र सरकारच्या ’गॅझेटियर्स’चे संपादक व लेखक होते. त्यांनी आपली संशोधने पुस्तक स्वरूपात प्रसिद्ध केली आहेत. शिवाजी महाराजांवर लिहिलेले यांचे संशोधित पुस्तक आजही प्रमाण मानले जाते. हे पुस्तक नॅशनल बुक ट्रस्ट या नवी दिल्लीतील प्रकाशनाने मराठी भाषेत प्रसिद्ध केले आहे
२. (१९२५) मराठी साहित्यात भयकथा व रहस्यकथांना आपला परीसस्पर्श देणारे सुप्रसिद्ध लेखक नारायण धारप यांचा जन्म
ते मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या
त्यांनी मराठीत १०० हून अधिक पुस्तके लिहिली, प्रामुख्याने भयपट प्रकारातील. धारप यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथा स्टीफन किंगसह समकालीन अमेरिकन लेखकांकडून प्रेरित आहेत. शपथ ही किंगच्या 'IT' आणि 'Gramma' (नंतर तुंबाड (चित्रपट) बनलेली) द्वारे प्रेरित कथा होती. नारायण धारप हे एचपी लव्हक्राफ्टचे चतुल्हू मराठी वाचकांसाठी आणणारे पहिले मराठी लेखक होते
३. (१९७६) हिंदी चित्रपट सृष्टीतील सुप्रसिद्ध पार्श्वगायक मुकेश यांचे निधन
तीस वर्षांच्या गायकीच्या कारकिर्दीत त्यांनी १०,००० हून अधिक गाण्यांना आपला आवाज दिला
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment