दिनविशेष २५ ऑगस्ट

दिनविशेष

दि. २५ ऑगस्ट

१. (१९२३) मराठी साहित्यिक, समीक्षक, लेखक अर्थतज्ज्ञ, ५६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गंगाधर गाडगीळ यांचा जन्म

ते मराठी लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते. त्यांनी नवकथेमध्ये नवनिर्मिती घडवून आणली. कथेचे नवे वळण विकसित करण्याचे श्रेय गंगाधर गाडगीळ यांचेकडे जाते. गाडगीळ आपल्या कथेतून वाचकांसमोर मनोरम चित्र रेखाटतात, एकरूप होतात. संज्ञा प्रवाही लेखन स्वप्नाचा प्रयोग त्यांनी लेखनात केला

लैंगिक मनोवृत्तींचा संघर्ष चित्रित करणारी 'लिलीचे फूल' ही त्यांची पहिली कादंबरी. मानसचित्रे, कडू आणि गोड, नव्या वाटा, तलावातील चांदणे, पाळणा हे त्यांचे उल्लेखनीय कथासंग्रह


२. (१९४१) मराठी संगीतकार अशोक पत्की यांचा जन्म

ते गीतकार आणि संगीत दिग्दर्शक आहेत. त्यांनी अनेक मराठी-हिंदी चित्रपटांना, जाहिरातींना व दूरदर्शन मालिकांना संगीत दिले आहे. आठ हजारांहून जास्त जिंगल्स, चारशे नाटकांचे संगीत, सव्वाशे चित्रपटांना संगीत, ५०० मालिकांची शीर्षकगीते त्यांच्या नावावर आहेत

‘नाविका रे वारा वाहे रे’ हे सुमन कल्याणपूर यांनी गायलेले गाणे हे अशोक पत्की यांनी अगदी पहिल्यांदा संगीतबद्ध केलेले गाणे होय

'यमुनाजळी' या गाण्याला दुसरी लोकप्रिय होऊ शकेल अशी चाल लावण्याचे धारि़ष्ट्य फक्त अशोक पत्कींचेच. मूळ चाल दादा चांदेकरांची

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर