दिनविशेष ३ ऑगस्ट
दिनविशेष
दि. ०३ ऑगस्ट
१. (१८८६) हिंदी कवी मैथिलिशरण गुप्त यांचा जन्म
राष्ट्रकवी मैथिली शरण गुप्त हे एक हिंदी कवी होते. हिंदी साहित्याच्या इतिहासातील खडीबोलीतील ते पहिले महत्त्वाचे कवी आहेत. साहित्यविश्वात त्यांना 'दादा' या नावाने संबोधले जायचे. त्यांचे भारत-भारती हे काम भारताच्या स्वातंत्र्यलढ्यादरम्यान खूप प्रभावी ठरले आणि म्हणूनच महात्मा गांधींनी त्यांना 'राष्ट्रीय कवी' ही पदवी दिली
२. (१९००) स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, ’पत्री सरकार’चे (प्रति सरकार) प्रणेते क्रांतिसिंह नाना पाटील यांचा जन्म
क्रांतिसिंह नाना पाटील हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील सैनिक आणि स्वातंत्र्योत्तर काळातील मराठी राजकारणी होते. क्रांतिसिंह नाना पाटील हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे क्रांतिकारक मानले जातात. त्यांचे कार्यक्षेत्र हे प्रामुख्याने सांगली सातारा या परिसरामध्ये होते
संसदेत मराठीत भाषण करणारे पहिले मराठी खासदार, सातारा, सांगलीसारख्या शहरांमध्ये ब्रिटीश सरकारच्या काळात प्रतिसरकारचा प्रयोग यशस्वी करुन दाखवणारे, लोकसभेत अध्यक्षाने 'आप कहा से आये हो?' असे विचारल्यानंतर बुक्कीने कांदा फोडणाऱ्या महाराष्ट्रातून मी आलो आहे असे सांगणारे क्रांतिसिंह नाना पाटील हे थोर स्वातंत्र्यसैनिक होत
३. (१९१६) गीतकार आणि शायर शकील बदायूँनी यांचा जन्म
शकील बदायुनी हे भारतीय उर्दू कवी, गीतकार आणि हिंदी / उर्दू भाषेतील चित्रपटातील गीतकार होते
४. (२००७) लेखिका सरोजिनी वैद्य यांचे निधन
सरोजिनी वैद्य या मराठीतील लेखिका, समीक्षिका होत्या. ललितलेखन, चरित्रलेखन, समीक्षा या साहित्यप्रकारांत त्यांनी लेखन केले. मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागप्रमुखपदी, तसेच राज्य मराठी विकास संस्थेच्या संचालकपदी त्यांनी काम केले
५. (२०२३) रानकवी व जेष्ठ मराठी लेखक पद्मश्री ना. धो. महानोर यांचे निधन
ते मराठी कवी, गीतकार, शेतकरी व माजी आमदार होते
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment