दिनविशेष १९ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १९ ऑगस्ट
* जागतिक छायाचित्रण दिन
* World Photography Day
आयुष्यातील महत्त्वाचे क्षण जपून ठेवण्यासाठी फोटोज (Photography) महत्त्वाचे ठरतात. असे म्हणतात की एखादा क्षण अमर करायचा असेल तर तो कॅमेर्यात कैद करावा. पूर्वी कॅमेरे नसताना व्यक्ती त्यांची सर्जनशीलता व्यक्त करण्यासाठी रेखाचित्र हे एक सशक्त माध्यम वापरत होते. प्राचीन लेण्यांमध्ये त्यांनी साकारलेली भित्तिचित्रे या वस्तुस्थितीची साक्ष देतात. मात्र आता परिस्थिती बदलली असून आजच्या या डिजिटल युगात कॅमेऱ्याने (Digital Camera) रेखाचित्राची जागा घेतली आहे. दरवर्षी १९ ऑगस्ट रोजी जगभरात 'जागतिक छायाचित्रण दिन' (World Photography Day) साजरा केला जातो
जागतिक छायाचित्रण दिन का साजरा केला जातो यामागे एक इतिहास दडलेला आहे. फोटोग्राफीचा उगम ९ जानेवारी, १८३९ रोजी फ्रान्समध्ये झाला. जगातील पहिली फोटोग्राफी प्रक्रिया म्हणून डग्युरिओटाइप प्रक्रिया मानली जाते. फ्रान्सच्या जोसेफ निसेफोर आणि लुई डगर यांनी ही प्रक्रिया सुरू केली आणि १९ ऑगस्ट १८३९ रोजी फ्रेंच सरकारने या शोधाची घोषणा केली आणि त्याचे पेटंट मिळवले. तेव्हापासून या दिवसाची आठवण म्हणून जागतिक छायाचित्रण दिन साजरा केला जातो
* जागतिक मानवतावादी दिन
* WorldHumanitarianDay
१९ ऑगस्ट हा दिवस जागतिक मानवतावादी दिन म्हणून मानला जातो. जगभरातील मानवतावाद्यांचा सन्मान करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. मानवता हे आपलं मूलभूत कर्तव्य आहे. याच मूल्याचा आणि हे मूल्य खऱ्या अर्थाने अंगीकारणाऱ्या प्रत्येकाचा सन्मान करण्यासाठी दरवर्षी १९ ऑगस्ट हा जागतिक मानवतावादी दिन म्हणून साजरा केला जातो. गरजू आणि असहाय्य लोकांच्या सेवेसाठी मनोभावे, अखंड आणि अविरतपणे तत्पर असणाऱ्या मानवतावादी लोकांच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो. गरजू लोकांना योग्यवेळी योग्य ते सहाय्य मिळालं पाहिजे हा या दिवसाचा खरा संदेश आहे
इराकमधील बगदाद येथील कॅनाल हॉटेलवर २००३ च्या बॉम्ब हल्ला करण्यात आला होता. ज्यात इराकमधील मुख्य मानवतावादी सर्जियो व्हेइरा डी मेलो यांच्यासह २२ लोकांचा बळी गेला होता. तेव्हापासून हा दिवस जागतिक मानवतावादी दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बगदाद दुर्घटनेनंतर ४ हजारांहून अधिक मदत कार्यकर्त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. अनेकांचा मृत्यू झाला, अनेक जण जखमी झाले, तर अनेकांना अटक करण्यात आली होती. या सगळ्यांच्या बलिदान प्रित्यर्थ हा दिवस साजरा केला जातो
१. (१९१८) भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. शंकर दयाळ शर्मा यांचा जन्म
हे भारतात राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री या पदांवर राहिलेले एकमेव राजकारणी आहेत
२. (१९९०) पत्रकार, संशोधक, मराठी वृत्तपत्राच्या इतिहासाचे लेखक रा. के. लेले यांचे निधन
३. (१९९३) निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते उत्पल दत्त यांचे निधन
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment