दिनविशेष १८ ऑगस्ट

दिनविशेष

दि. १८ ऑगस्ट

१. (१८७२) शास्त्रीय गायक व संगीतकार विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा जन्म

त्यांचे संगीत क्षेत्रातील कार्य संगीतोद्धाराचे होते. संगीत क्षेत्रात नेतृत्व करून समाजात या कलेला प्रतिष्ठा देण्याचे होते. तसेच संगीत कलेला व संगीतकारांना पद्धतशीर वळण लावण्याचे, कार्य त्यांनी केले

२. (१९००) भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कार्यकर्त्या व संयुक्त राष्ट्र संघातील आमसभेच्या पहिल्या महिला अध्यक्षा विजयालक्ष्मी पंडित यांचा जन्म

विजयालक्ष्मी पंडित या संसदपटू व उत्तम वक्त्या म्हणून प्रसिद्ध होत्या. २१ विद्यापीठांनी त्यांना डॉक्टरेट ही पदवी देऊन गौरविले. त्यांनी महाराष्ट्राच्या राज्यपाल म्हणून १९६२ ते १९६४ पर्यंत काम केले. १९५३ मध्ये त्या संयुक्त राष्ट्रांच्या पहिल्या महिला अध्यक्षा बनल्या. इ.स. १९६४ मध्ये त्या फूलपूर लोकसभा मतदार संघातून खासदार म्हणून निवडून आल्या. विजयालक्ष्मी पंडित या इंग्लंड, रशिया आणि माॅस्को येथे वेगवेगळ्या वेळी भारताच्या राजदूत होत्या


३. (१९३४) भारतीय गीतकार, चित्रपट कथाकार गुलजार यांचा जन्म

गुलज़ार हे हिंदी चित्रपटसृष्टीत आपल्या विशिष्ट शब्दशैलीसाठी ओळखले जातात. ज्या सामान्यतः गीतांमध्ये वापरल्या जात नाहीत, अश्या प्रतिमा गुलज़ार यांच्या गीतांमध्ये ठिकठिकाणी वापरलेल्या आढळतात

४. (१९४५) क्रांतीकारक, आझाद हिंद सेनेचे प्रमुख नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे निधन

५. (१९७९) महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, रोजगार हमी योजनेचे जनक वसंतराव नाईक यांचे निधन

ते प्रख्यात कृषीतज्ञ, प्रगतशील शेतकरी व राजनितीज्ञ होते. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी ते सर्वाधिक काळ होते. नाईक हे महाराष्ट्रातील हरित क्रांती, पंचायत राज तसेच श्वेतक्रांती व रोजगार हमी योजनेचे जनक मानले जातात

६. (२०००) रहस्य कथाकार नारायण धारप यांचे निधन

ते मराठी भाषेतील लेखक, नाटककार होते. प्रामुख्याने भयकथा, गूढकथांकरता यांची ख्याती आहे. यांनी निर्मिलेले 'समर्थ' हे काल्पनिक पात्र आणि त्यावर आधारित गूढकथा विशेष गाजल्या

त्यांनी मराठीत १०० हून अधिक पुस्तके लिहिली, प्रामुख्याने भयपट प्रकारातील. धारप यांच्या अनेक कादंबऱ्या आणि कथा स्टीफन किंगसह समकालीन अमेरिकन लेखकांकडून प्रेरित आहेत

७. (२०१८) शांततेचे नोबल पारितोषिकाने सन्मानित मुत्सद्दी समाजसेवक व संयुक्त राष्ट्र संघटनेचे माजी अध्यक्ष कोफी अन्नान यांचे निधन

कोफी अन्नान यांनी आफ्रिका देशात एड्ससारख्या महाभयंकर आजारावर केलेले कार्य स्पृहणीय आणि प्रेरणादायी आहे

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर