दिनविशेष १६ ऑगस्ट

दिनविशेष

दि. १६ ऑगस्ट

१. (१८८६) स्वामी विवेकानंद यांचे गुरू रामकृष्ण परमहंस यांनी समाधी घेतली

ते एकोणिसाव्या शतकातील भारतात बंगालमध्ये होऊन गेलेले जगद्विख्यात गूढवादी सत्पुरुष होते. स्वामी विवेकानंद हे रामकृष्ण परमहंसांचे प्रमुख शिष्य होते. आधुनिक भारतीय धर्मप्रबोधनात त्यांनी कामगिरी बजावली

२. (१९५२) मराठी गायिका आणि अभिनेत्री किर्ती शिलेदार यांचा जन्म

संगीत नाटकांतील गायनाकरता त्या विशेष ओळखल्या जात. रंगभूमीवर भूमिका रंगवताना त्यांनी नेहमी अभ्यासपूर्ण सौंदर्यशोध घेतला. त्यामुळेच त्यांच्या सर्व भूमिका आगळ्या व वैशिष्ट्यपूर्ण ठरल्या आहेत. संगीत रंगभूमीवर त्यांनी स्वतःचे आगळे स्थान निर्माण केले आहे. संगीत नाटके व स्वतंत्र मैफलींच्या निमित्ताने भारतभर तसेच इंग्लंड-अमेरिकेत त्यांचे कार्यक्रम झाले आहेत. सौंदर्यशोधक दृष्टीने शास्त्रीय संगीतातील अकारण होणारे शब्दोच्चारांचे दुर्लक्ष टाळले जावे, या हेतूने त्यांनी ’स्वर ताल शब्द संगती’या नावाचे हे संशोधनात्मक पुस्तक लिहिले आहे. संगीत स्वरसम्राज्ञी हे कीर्ती शिलेदार यांचे अत्यंत गाजलेले नाटक

३. (१९५७) महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री, गृहमंत्री आर. आर पाटील उर्फ आबा यांचा जन्म

ग्रामविकास मंत्री असताना त्यांनी सुरू केलेल्या ‘गाडगेबाबा स्वच्छता अभियान’ व ‘तंटामुक्त गाव’ यासारख्या योजना महाराष्ट्रात मोलच्या दगड ठरल्या. तसेच ते गृहमंत्री असताना त्यांनी सलग पाच वर्षात ५० हजार पोलीस शिपाई पदांची पारदर्शकपणे भरती केली. जी आजपर्यंतची सर्वात मोठी शासकीय जागांची भरती होती. त्यामुळे अनेक गरीब मुलांचे सरकारी कर्मचारी होण्याचे स्वप्न पूर्ण झाले 


४. (१९६३) मराठी अभिनेते, दिग्दर्शक अरूण नलावडे यांचा जन्म

त्यांच्या सर्व भूमिका संवेदनशीलपणे प्रेक्षकांपुढे येतात. त्यांची प्रत्येक भूमिका प्रेक्षकांना नवा विचार देऊन जाते आणि त्या भूमिकेचे बारकावेही मांडते. आपल्या आजूबाजूला वावरणारी माणसेच कलाकृतीत दिसतात, त्यांचाच आविष्कार कलाकृतीतून होत असतो, या साहित्य व समाज यांच्यातील अन्योन्यसंबंधाचे भान अरुण नलावडे यांच्याकडे असलेले दिसते. त्याचे उदाहरण द्यायचे झाले तर आपल्याला ‘श्‍वास’ या चित्रपटाचे द्यावे लागेल

५. (१९६८) दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा जन्म

ते आम आदमी पार्टीचे संस्थापक व पक्षाध्यक्ष व दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री आहेत

६. (२०१०) कवी नारायण गंगाराम सुर्वे यांचे निधन

श्रमिकांच्या दैनंदिन आयुष्याची व श्रमशक्तीच्या चढउतारांची स्पंदने त्यांच्या कवितेत अनोख्या ढंगाने प्रकट होतात. माणूस व मेहनत ह्यांचे अतुट नाते, हा त्यांच्या कवितेचा कणा आहे

७. (२०१८) भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे निधन

एक हिंदी कवी म्हणूनही ते प्रसिद्ध होते

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर