दिनविशेष १५ ऑगस्ट

दिनविशेष

दि. १५ ऑगस्ट

* भारतीय स्वातंत्र्य दिन

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताने १५० वर्षांची जुलुमी राजवट मोडून काढत ब्रिटिशांकडून स्वातंत्र्य मिळवले. १५ ऑगस्ट रोजी भारतामध्ये स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो


१. (१८७२) आधुनिक भारतातील प्रख्यात तत्त्वचिंतक, स्वातंत्र्यसैनिक, योगी व कवी महर्षी अरविंद घोष यांचा जन्म

२. (१९१७) ललित, वैचारिक, नाट्य, काव्य आदी विविध प्रकारांत मोठ्या प्रमाणावर लेखन करणार्‍या लेखिका अंबूताई गोरे यांचा जन्म

'दुर्दैवाशी दोन हात' या त्यांच्या आत्मचरित्रपर पुस्तकाला १९७५ मधे राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला होता

३. (१९२२) लोककवी वामनदादा कर्डक यांचा जन्म 

'सांगा आम्हाला बिर्ला बाटा टाटा कुठे हाय हो, सांगा धनाचा साठा न आमचा वाटा कुठे हाय हो' अशा कवनांनी साम्राज्यशाहीला वामनदादांनी आव्हान दिले होते. सन १९२० ते १९५६ हा आंबेडकर चळवळीचा कालखंड होता. या कालखंडात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर वामनदादांनी फिरून समाजजागृतीचे काम केले होते

४. (१९२९) साहित्यिक, अनेकांना लिहिते करणारे, वाचकप्रिय ‘वीणा‘ या दर्जेदार मासिकाचे संपादक उमाकांत निमराज ठोमरे यांचा जन्म

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर