दिनविशेष १४ ऑगस्ट

दिनविशेष 

दि. १४ ऑगस्ट

१. (१९०७) लेखिका, सामाजिक कार्यकर्त्या कॉम्रेड गोदावरी परूळेकर यांचा जन्म

या भारतीय स्वातंत्र्यसैनिक, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या, व मराठी लेखिका होत्या. गोदावरी ताईंनी वारली समाजातील स्त्रियांवर होणारे अत्याचार पहिले. या स्त्रिया एका दृष्टचक्रात अडकल्या होत्या. विक्षिप्त जमीनदार आणि सामाजिक पितृसत्ताक दबाव यामुळे त्यांची मोठी घुसमट होत होती. याविरूद्ध त्यांनी मोठा संघर्ष करून लढा दिला 

२. (१९२५) कथाकार, कादंबरीकार, नाटककार जयवंत दळवी यांचा जन्म

१९४८ मध्ये त्यांनी 'दातार मास्तर' ही पहिली कथा लिहिली. १७ कथासंग्रह, १८ कादंबऱ्या व १९ नाटकं आदी विपुल साहित्य संपदा त्यांचा नावावर आहे. 'ठणठणपाळ' या टोपणनावाने त्यांनी स्तंभलेखन केले

३. (१९८४) १९५२ च्या हेलसिंकी ऑलिम्पिक मध्ये वैयक्तिक पदक मिळवणारे पहिले भारतीय कुस्तीगीर, कराडचे सुपुत्र खाशाबा जाधव यांचे निधन

ते भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील १९५२ मधील उन्हाळी ऑलिंपिकमध्ये त्यांनी कांस्यपदक मिळवले


४. (२०१२) सरपंच ते मुख्यमंत्री अशी राजकीय मजल मारणारे, मुत्सद्दी नेते, प्रभावी वक्ते, कुशल प्रशासक महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर