दिनविशेष १३ ऑगस्ट
दिनविशेष
दि. १३ ऑगस्ट
* अवयव दान दिन
१३ ऑगस्ट रोजी जगभरात अवयवदान दिन (Organ Donation Day) साजरा केला जातो. आधुनिक वैद्यकशास्त्रामुळे व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत अवयव प्रत्यारोपण करणे शक्य झाले आहे. १९५४ मध्ये अमेरिकेत पहिले यशस्वी अवयव प्रत्यारोपण करण्यात आले. एक शरीर अवयव दान ७ लोकांना आशेचा किरण ठरू शकते. तर ३५ लोकांच्या आयुष्याचा दर्जा सुधारू शकते
* लेफ्ट (डावरा) हँड डे
१३ ऑगस्ट हा आंतरराष्ट्रीय डावरा दिन म्हणून साजरा केला जातो. डावखुरेपणा ही व्याधी नाही असे असणं, पूर्णतः नॉर्मल आहे हे सत्य पालकांपर्यंत पोचवलं जावं, जेणेकरून एखाद्या मुलाचे दडपणामुळे भावविश्व कोमेजले जाऊ नये हा महत्त्वाचा उद्देश या दिनामागे असतो
१. (१७९५) सुधारणावादी राज्यकर्त्या आहिल्याबाई होळकर यांचे निधन
त्या भारतातील, माळव्याच्या 'तत्त्वज्ञानी माहाराणी' म्हणून ओळखल्या जातात. मल्हाररावांनी त्यांना प्रशासकीय व सैन्याच्या कामात पारंगत केलेल होते. त्या आधाराने अहिल्याबाईंनी इ.स. १७६६ ते इ.स. १७९५, म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत माळव्यावर राज्य केले होते
२. (१८९०) बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे याचा जन्म
ते मराठीतील एक श्रेष्ठ निसर्गकवी होते. इ.स. १९०७ मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबरेंना बालकवी ही उपाधी दिली
३. (१८९८) महाराष्ट्रातील एक झंझावाती व्यक्तिमत्व प्रल्हाद केशव अत्रे तथा प्र. के. अत्रे यांचा जन्म
ते मराठीतील नावाजलेले लेखक, कवी, नाटककार, संपादक, चित्रपट निर्माते, शिक्षणतज्ज्ञ, राजकारणी व वक्ते होते. ते महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी उभ्या राहिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील प्रमुख नेते होते
२१ जानेवारी १९४० ला अत्रे यांनी नवयुग हे वृत्तपत्र सुरू केले होते. नोव्हेंबर १५, इ.स. १९५६ रोजी त्यांनी मराठा हे दैनिक सुरू केले. ते त्यांच्या हयातीनंतरही काही काळ प्रकाशित होत होते. त्यांच्या प्रसिद्ध साहित्यकृती डॉ. लागू, झेंडूची फुले, कऱ्हेचे पाणी (आत्मचरित्र)
अत्र्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'श्यामची आई' चित्रपटाला १९५४ साली सुरू झालेल्या 'राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार' सोहोळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे पहिले 'सुवर्ण कमळ' मिळाले होते
४. (१९०६) मराठी साहित्यिक विश्राम बेडेकर यांचा जन्म
ते मराठीतले लेखक आणि चित्रपट दिग्दर्शक होते
५. (१९१०) आधुनिक नर्सिंग शास्त्राच्या जनक फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांचे निधन
त्या अग्रगण्य परिचारिका, लेखक व संख्याशास्त्रज्ञ होत्या. इ.स. १८५३ साली झालेल्या क्राइमियन युद्धदरम्यान जखमी सैनिकांची सुश्रुषा केल्याबद्दल त्यांना प्रसिद्धी मिळाली. त्यांना "लेडी विथ द लॅम्प" (The Lady with the Lamp) असे म्हणत. अतिशय सुखवस्तू घराण्यात जन्म होऊनही परमेश्वराने आपल्याला भूतदयेसाठी व मानवतेची सेवा करण्यासाठीच जन्माला घातले अशा भावनेने त्या प्रेरित झाल्या होत्या. रेडक्रॉसचे संस्थापक हेन्री ड्युनंट यांनी त्यांना 'लेडी विथ द लॅम्प' ही उपाधी दिली. त्यांच्या हातातील कौशल्य व वैज्ञानिक दृष्टिकोनातून रूग्णसेवा केल्यामुळेच परिचर्याशास्त्राला नवीन दिशा प्राप्त झाली. 'The Lady with a Lamp' या नावाने प्रसिध्द असलेल्या फ्लॉरेन्स नाइटिंगेल या ‘ऑर्डर ऑफ मेरिट’ हा किताब मिळवणाऱ्या पहिल्या महिला होत्या. त्यांच्या आयुष्यावर बेतलेला #TheLadywithaLamp हा सिनेमा प्रदर्शित झाला होता
६. (१९१३) मराठी चित्रपट दिग्दर्शक वसंत पेंटर यांचा जन्म
क्षेत्र छोटे असले तरी मोकळेपणाने काम करायला मिळावे, म्हणून मराठी चित्रपट करण्यासाठी वसंतराव आपल्या गावी कोल्हापूरला परतले आणि त्यांची एक नवी कारकिर्द सुरू झाली. तो जमाना तमाशाप्रधान चित्रपटांचा होता. तमाशाला रहस्याची झालर देणारा ‘१२ वर्षे ६ महिने ३ दिवस’ हा त्यांचा पहिला मराठी चित्रपट. ना.ग. करमकर त्याचे लेखक होते. उमा, सूर्यकांत, राजशेखर यांच्या प्रमुख भूमिका होत्या
वाड्मयीन कथा ही चित्रपटासाठी आवश्यक असते कारण ती शाश्वत असते, ही वसंतरावांची महाराष्ट्र फिल्म कंपनीपासून पक्की झालेली भावना. त्यानुसार त्यांनी प्रसिद्ध ग्रामीण कादंबरीवर ‘टिळा लाविते मी रक्ताचा’ हा ग्रामीण चित्रपट दिग्दर्शित केला. जयश्री गडकर, सूर्यकांत, राजशेखर यांनी कामे केलेला हा चित्रपट गाजला. यानंतर परत अण्णाभाऊंच्या कादंबरीवर वसंतरावांनी ‘वारणेचा वाघ’ हा चित्रपट केला. तोही यशस्वी झाला. द.का. हसबनीस या साहित्यिकाने लिहिलेला, ४२ च्या स्वातंत्र्य चळवळीवरील ‘सुगंधी कट्टा’ हा तमाशाप्रधान चित्रपट त्यांनी दिग्दर्शित केला. पण ‘पाच नाजूक बोटे’ या लोकप्रिय लेखक बाबा कदम यांच्या कथेवरील रहस्यमय चित्रपट होय
७. (१९२६) क्युबाचे माजी राष्ट्रपती फिडेल कॅस्ट्रो यांचा जन्म
त्यांनी प्रथम पंतप्रधान व नंतर राष्ट्राध्यक्ष ह्या पदांद्वारे क्युबावर एकूण ४७ वर्षे सत्ता चालवली. कट्टर साम्यवादी मार्क्सवादी-लेनिनवादी विचारसरणीच्या कॅस्ट्रोंच्या राजवटीदरम्यान क्यूबा पूर्णपणे एक-पक्षीय समाजवादी राष्ट्र बनले होते. अमेरीका सारख्या बलाढ्य राष्ट्राविरूद्ध त्यांनी सहा दशके लढा दिला
८. (१९३६) थोर महिला क्रांतिकारक मॅडम भिकाजी कामा यांचे निधन
दादाभाई नौरोजी यांच्या सचिव म्हणून मादाम कामा यांनी काम केले. त्यांनी युरोपात युवकांना एकत्र करून भारताला स्वांतत्र्य मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यास प्रवृत्त केले
इ.स. १९०७ साली जर्मनीतल्या श्टुटगार्ट येथे आंतरराष्ट्रीय साम्यवादी परिषद भरली होती. या परिषदेसाठी विविध देशांचे हजारावर प्रतिनिधी आले होते. त्या परिषदेत मादाम कामांनी साडी नेसून व भारतीय झेंडा घेऊन या परिषदेतील सदस्यांना भारताबद्दल माहिती दिली
९. (१९८०) मराठीतील अष्टपैलू आणि प्रतिभासंपन्न साहित्यिक पुरुषोत्तम भास्कर तथा पु. भा. भावे यांचे निधन
मराठी लेखक आणि ज्येष्ठ विचारवंत होते. पु.भा. भावे यांनी १७ कादंबऱ्या, पाच नाटके, १४ लेखसंग्रह आणि दोन प्रवासवर्णने लिहिली आहेत. त्यांनी आत्मचरित्रही लिहिले आहे. ते सौदर्यवादी लेखक आहेत
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment