दिनविशेष ११ ऑगस्ट

दिनविशेष

दि. ११ ऑगस्ट

१. (१९०८) क्रांतिकारक खुदिराम बोस यांचे निधन

भारतातील सर्वात तरुण वयाचे क्रांतिकारक म्हणून ओळखले जाणारे हे खुदिराम बोस वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शहीद झाले

२. (१९२८) साहित्यिक, पत्रकार विनायक सदाशिव तथा वि. स. वाळंबे यांची जन्म

ते मराठी लेखक व पत्रकार होते. यांनी विशेषकरून ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या

३. (१९७०) मानवशास्त्र विषयातील जागतिक कीर्तीच्या विचारवंत इरावती कर्वे यांचे निधन

त्यांनी वर्णव्यवस्था जातिसंस्थेचा उगम आणि प्राचीन काळापासून भारतीय समाजात असलेले स्त्रीचे स्थान यांबद्दलचे मूलभूत विचार मांडले

४. (२०१५) मराठी रंगभूमीवरील एक श्रेष्ठ नाट्य-अभिनेते, दिग्दर्शक, नाट्य-निर्माते आणि नेपथ्यकार भालचंद्र पेंढारकर यांचे निधन

त्यांनी दुरितांचे तिमिर जावो आणि पंडितराज जगन्नाथ ही दोन नाटके दिग्दर्शित केली. भालचंद्र पेंढारकर अर्थात अण्णा हे अत्यंत व्यासंगी, शिस्तबद्ध आणि रंगभूमीवर अमाप श्रद्धा असणारे रंगकर्मी होते. तिसरी घंटा जाहीर केलेल्या वेळेवरच देणारे आणि त्याच क्षणी बुकिंगची पर्वा न करता नाटक सुरू करणारे एकमेव निर्माता आणि अभिनेते होते

५. (२०२०) स्वातंत्र्य, समता व बंधुता विचारांचे खंदे पुरस्कर्ते ख्यातनाम शायर राहत इंदौरी यांचे निधन 

भारतातच नाही तर परदेशातूनही त्यांना शायरांकडून आमंत्रण मिळत होते. आपली शब्दसंपदा आणि अफलातून शायरी यांमुळे त्यांचे एक वेगळे स्थान निर्माण झाले होते. उर्दू साहित्य म्हणून त्यांना प्रसिद्धी मिळाली


#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर