दिनविशेष ५ जुलै
दिनविशेष
दि. ०५ जुलै
१. (१९२०) मराठीतले एक लेखक, साहित्यिक आनंद साधले यांचा जन्म
२. (१९९६) मराठीतील प्रसिद्ध रहस्यकथाकार चंद्रकांत सखाराम चव्हाण तथा बाबूराव अर्नाळकर यांचे निधन
ते बाबूराव अर्नाळकर या टोपणनावाने लिहिणारे मराठी लेखक होते. मॅट्रिकच्या वर्गात असताना शाळा सोडलेले बाबूराव मराठीतील आघाडीचे रहस्यकथा लेखक होते. त्यांनी एकूण १०४२ रहस्यकथा लिहिल्या. खऱ्या अर्थाने त्यांनी तळागाळातल्या माणसांना मराठी वाचनाची गोडी लावली. चार आणे मालांपासून त्यांनी सुरुवात केली. त्यांचे नायक झुंजार, धनंजय-छोटू, मेजर सुदर्शन, इन्स्पेक्टर दिलीप, दर्यासारंग हे मराठी घरांघरांतून फिरले
#vishalinc5 #satara #सातारा
Comments
Post a Comment