दिनविशेष १ ऑगस्ट

दि. १ ऑगस्ट

दिवस ३७०

* महसूल दिन (महाराष्ट्र राज्य)

महसूल विभागातर्फे दरवर्षी आपल्या कामकाजाचा आढावा जनतेसमोर ठेवण्यासाठी १ ऑगस्ट हा महसूल दिन म्हणून साजरा करण्यात येतो

* जागतिक स्तनपान सप्ताह

जागतिक स्तनपान सप्ताह दरवर्षी १-७ ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. युनिसेफच्या अहवालानुसार जगातील एकूण बालकांपैकी सुमारे ६० टक्के बालकांना सहा महिन्यांपर्यंत आवश्यक स्तनपान मिळत नाही. १९९०-९१ मध्ये WABA ची स्थापना केली गेली आणि १९९२ मध्ये पहिला वर्ल्ड ब्रेस्टफीडिंग आठवडा आधिकृत रुपात आयोजित केला गेला

१. (१८७९) 'संदेश' वृत्तपत्राचे संस्थापक, संपादक अच्युत बळवंत कोल्हटकर यांचा जन्म

अच्युत बळवंत कोल्हटकरांनी १९१५ साली काढलेल्या संदेश ह्या पत्राने मराठी वृत्तपत्रसृष्टीचा गंभीर चेहरामोहराच बदलून टाकला. भावनेला आवाहन करणारे, तसेच कल्पकतेने आणि विनोदाने प्रतिपक्षाची भंबेरी उडवून टाकणारे अग्रलेख, ‘संदेशचा अहेर’, ‘बेटा गुलाबच्या कानगोष्टी’, ‘चहा, चिवडा, चिरूट’, ‘संदेश दरबारचा पदवीदान समारंभ’ इ. चटकदार सदरे, चित्तवेधक, बातम्या, आकर्षक मथळे ह्यांमुळे मराठी वृत्तपत्रीय लेखनात बहुरंगीपणा आला व ते जनसामान्यांपर्यंत पोहोचले

२. (१९१३) चित्रपट अभिनेते व दिग्दर्शक, निर्माते भगवान आबाजी पालव ऊर्फ ’मास्टर भगवान’ यांचा जन्म

माणसाने नृत्य असं करावं की त्या नृत्यप्रकाराला कायमस्वरूपी आपल्या नावाने ओळखलं जावं. हे वाक्य सार्थ करून दाखवणारे अभिनेते भगवान आबाजी पालव उर्फ 'भगवान दादा'

भगवान आधी स्टंट चित्रपटांत कामे करायचे. पुढे त्यांनी स्वतःची चित्रपट कंपनी काढली. भगवान यांनी एकूण २९३ चित्रपटांत अभिनय केला आहे. त्यांनी ३४ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे, २ चित्रपटांची पटकथा लिहिली आहे आणि एका चित्रपटाची निर्मिती केली आहे. बऱ्याच चित्रपटांतील त्यांनी भूमिका केलेल्या पात्राचे नाव भगवान किंवा भगवानदादा असे

३. (१९२०) संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून ते अगदी गोवा मुक्ती संग्रामामध्येही आपल्या शाहिरीतून लोकप्रबोधन करणारे लोककवी, लेखक, समाजसुधारक, साहित्यरत्न, फकिरा कार, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा जन्म 

साठे हे मांग (अस्पृश्य) समाजामध्ये जन्मलेले होते. त्यांचे लेखन सामाजिक आणि राजकीयदृष्ट्या कृतिशीलतेवर आधारलेले होते. साठे हे मार्क्सवादी-आंबेडकरवादी प्रवृत्तीचे होते, सुरुवातीला त्यांच्यावर साम्यवादी विचारसरणीचा प्रभाव होता. दलित साहित्याचे संस्थापक म्हणून त्यांना श्रेय दिले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळीत देखील त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती

अण्णा भाऊ साठे यांचे साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूणच जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. आजही मोठ्या संख्येने विद्यार्थी व अभ्यासक हे त्यांच्या या साहित्याचा संशोधनात्मक अभ्यास करताना दिसतात. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजविण्याचे काम शाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आणि शाहीर द.न. गव्हाणकर यांनी केले. मुंबई, मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम महाराष्ट्र तसेच सीमाभागातील अनेक ठिकाणी शाहिरांनी आपल्या लालबावटा कलापथकाचे कार्यक्रम सादर केले


४. (१९२०) समाजसुधारक बाळ गंगाधर टिळक उर्फ लोकमान्य टिळक यांचे निधन 

टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हटले. त्यांना 'लोकमान्य' ही पदवी देखील बहाल करण्यात आली

५. (१९३३)अभिनेत्री मीनाकुमारी यांचा जन्म

अनेक चित्रपटात शोकात्मक व शोकांतक भूमिका केल्यामुळे त्यांना 'ट्रॅजेडी क्वीन' ही म्हणत असत. त्यांना कधीकधी भारतीय चित्रपटांची 'सिंड्रेला' असेही संबोधण्यात येत होते

५. (१९६२) महाराष्ट्र राज्यात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (MIDC) ची स्थापना
 
महाराष्ट्र राज्यात लघु, निम्नलघु, मध्यम उद्योगात जलदगतीने चालना मिळावी व सुव्यवस्थापन व्हावे या उद्देशाने महामंडळाची स्थापना करण्यात आली

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर