दिनविशेष २६ जुलै

दिनविशेष

दि. २६ जुलै

* कारगिल विजय दिवस

१. (१८५६) आयरिश लेखक, नाटककार आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे सह-संस्थापक जॉर्ज बर्नार्ड शॉ यांचा जन्म

संगीत आणि साहित्य-समीक्षा या विषयांवर बर्नार्ड शॉ यांनी पहिले लाभदायक लेखन केले. त्याच ताकदीने त्यांनी वृत्तपत्रांत अनेक अत्यंत चांगले लेख लिहिले. मात्र बर्नार्ड यांची मुख्य प्रतिभा नाटक ही होती. आणि त्यांनी ६० पेक्षा जास्त नाटके लिहिली आहेत. ते एक निबंधकार, कादंबरीकार आणि लघुकथा लेखक देखील होते. त्यांचे जवळजवळ सर्व लेखन प्रचलित सामाजिक समस्यांवर होते, परंतु त्याला एक विनोदाची झालर होती. त्यामुळे ते रोचक होई. प्रचलित शिक्षण, विवाह, धर्म, सरकार, आरोग्य आणि वर्ग विशेषाधिकार ह्या मुद्‍द्यांकडे त्यांचे लिखाण लक्ष वेधून घेई

श्रमिक वर्गाच्या शोषणावर त्यांना फार राग होता. एक उत्कट सोशलिस्ट, शॉ यांनी फेबियन सोसायटीसाठी अनेक पत्रिका व व्याख्याने लिहिली आहेत. या सोसायटीत दिलेल्या व्याख्यानांतून, जॉर्ज बर्नार्ड शॉ यांनी महिला व पुरुष समान हक्क मिळविणे, कामगार वर्गाच्या अपेष्टा कमी करणे आणि निरोगी जीवनशैलीच्या संपादन करणे या विषयांचा प्रचार केला आणि ते एक प्रभावी वक्ता बनले

कोणत्याही सामाजिक व्यवस्थेत एक प्रकारची एकात्मता आणि आत्मसुसंगती असते. त्यामुळे तिच्या कोणत्याही भागाचा अभ्यास करून तिच्या समग्र स्वरूपाचे आकलन होऊ शकते, असे शॉचे मत होते. ह्या समग्रतेचे जपलेले नेमके भान त्याच्या नाट्यसृष्टीतून प्रत्ययास येते. ने स्वतःला आपल्या पिढीचा सर्वश्रेष्ठ नाटककार मानले. त्याचा प्रभाव ब्रिटिश रंगभूमीवर सुमारे ५० वर्षे होता. साहित्याचा नोबेल पुरस्कार त्याला १९२५ साली देण्यात आला

२. (१९९९) भारताचा कारगिल युद्धात विजय झाला

३. (२००५) मुंबई परिसरात २४ तासांत सुमारे ९९५ मिमी पाऊस पडून, पूर्ण मुंबई जलमय झाली. यामध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडले


४. (२००९) मराठी नाट्य चित्रपट संगीतकार भास्कर चंदावरकर यांचे निधन

भारतीय विविध भाषांतील ४० चित्रपटांना त्यांनी संगीत दिले. थोडासा, रुमानी हो जाए, सामना, सिंहासन, आक्रित, कैरी हे त्यांनी संगीतबद्ध केलेले चित्रपट गाजले. श्वास या मराठी चित्रपटासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर