दिनविशेष २५ जुलै

दिनविशेष

दि. २५ जुलै 

१. (१८८०) समाजसुधारक, स्वदेशी चळवळीचे प्रणेते गणेश वासुदेव जोशी ऊर्फ सार्वजनिक काका यांचे निधन

शेतकी व आरोग्य हे त्यांचे आवडते विषय होते. शास्त्रीय ज्ञानाची जोड देऊन शेतीत नवे प्रयोग करावेत व संशोधन करावे असे त्यांना वाटत असे

गणपतरावांनी २ एप्रिल १८७० रोजी 'पुणे सार्वजनिक सभे'ची स्थापना केली. या संस्थेतर्फे गणपतरावांनी जी विधायक व समाजोपयोगी कामे केली, त्यामुळे त्यांना 'सार्वजनिक काका' हे टोपणनाव मिळाले

२. (१९१९) गायक, संगीतकार सुधीर फडके यांचा जन्म

बाबूजी या नावानेदेखील त्यांना ओळखले जाते. त्यांनी जवळपास ५० वर्षे मराठी चित्रपटसृष्टीवर राज्य केले. मराठी सुगम संगीतावरील त्यांचे प्रभुत्व वादातीत आहे. फडके यांनी मराठी व्यतिरिक्त अनेक हिंदी चित्रपटांमध्येही गाणी गायली आणि संगीतबद्ध केली

३. (१९२२) कवी, वक्ते, कलावंत, संपादक वसंत बापट यांचा सातारा जिल्ह्यातील कराड येथे जन्म

वसंत बापट तरुण वयातच भारताच्या स्वांतत्र्यलढ्यात सहभागी झाले. १९४२ च्या चलेजाव चळवळीत त्यांचा सहभाग होता. ऑगस्ट १९४३ पासून जानेवारी १९४५ पर्यंत ते तुरुंगात होते. तुरुंगातून सुटल्यावर वसंत बापट 'नॅशनल कॉलेज (वांद्रे) आणि 'रामनारायण रुईया कॉलेज (माटुंगा)' ह्या मुंबईतील महाविद्यालयांत मराठी व संस्कृत ह्या विषयांचे प्राध्यापक झाले. लहानपणापासून बापटांवर राष्ट्रसेवा दलाचे आणि साने गुरुजींच्या सहवासाचे संस्कार झाले. शेवटपर्यंत ते राष्ट्रसेवा दलाशी संलग्न होते. 'बिजली' ह्या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहावर ह्या संस्कारांचा प्रभाव स्पष्टपणे जाणवतो. 'अकरावी दिशा', 'सकीना' आणि 'मानसी' हे त्यांचे ’बिजली’नंतरचे काव्यसंग्रह होते. त्यांनी लहान मुलांसाठीही कविता लिहिल्या. वसंत बापट १९८३ ते १९८८ या काळात साधना नियतकालिकाचे संपादक होते. १९९९ मध्ये मुंबई येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले


४. (२००१) "बॅंडिट क्वीन" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एक भारतीय स्त्री आणि त्यानंतर झालेल्या संसद सदस्या फूलन देवी यांचे निधन

त्यांनी आपल्या विरूद्ध झालेल्या अन्याया विरोधात मोठी लढाई लढली होती. स्त्री शक्तीच्या पुरस्कर्त्या म्हणून त्यांना ओळखले जाते

५. (२०१५) भारतीय वकील आणि राजकारणी आर. एस गवई यांचे निधन

ते भारतीय राजकारणी, सामाजिक कार्यकर्ते, दलित चळवळीतील ज्येष्ठ नेते, आणि रिपाइं गवई गटाचे संस्थापक व अध्यक्ष होते. ते आंबेडकर प्रणीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष होते, आणि या पक्षाच्या माध्यमातून त्यांनी राजकीय व सामाजिक क्षेत्रातही अनेक कामे केली. गवई यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतही काम केले होते. ते बिहार, सिक्किम व केरळ या तीन राज्यांचे राज्यपाल, तसेच लोकसभा व राज्यसभा या संसदेच्या दोन्ही सदनाचे सदस्य (खासदार) होते. गवई हे महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सलग ३० वर्ष सदस्य (आमदार) होते, यादम्यान त्यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती, उपासभापती व विरोधी पक्षनेता या पदांवर कार्य केले होते. त्यांवी अनेक सामाजिक कामे सुद्धा केलेली आहेत

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर