दिनविशेष २३ जुलै

दिनविशेष 

२३ जुलै

* वन संवर्धन दिवस

२३ जूलै हा दिवस 'वनसंवर्धन दिन' (Forest Conservation Day ) म्हणून साजरा केला जातो. हा दिवस निसर्गातील प्रत्येक गोष्टी जसे झाडे, डोंगर, नद्या, वने, प्राणी, पक्षी यांचे संवर्धन व्हावे आणि समाजात नैसगिक साधनसंपत्तीविषयी जागृती निर्माण व्हावी म्हणून साजरा केला जातो. आताच्या चालु युगाला विज्ञान आणि तंत्रज्ञाना चे प्रगतशील युग म्हटले जाते. आधुनिक पद्धतीने मानवी बुद्धी व तंत्रांच्या आधारावर विकास आणि प्रगतीचा आलेख उंचावण्यासाठी जगात चढाओढ करत आहे. हे करत असताना मानवाच्या वाढत्या गरजा, अन्नधान्य, कारखाने, उत्पादने यांची वाढती गरज आणि सोबतच लोकसंख्यानुसार वाढती मागणी या सगळ्या गोष्टींचा प्रचंड ताण नैसर्गिक साधनसंपत्तीवर पडत आहे. नैसर्गिक वनसंपत्तीला नष्ट करून त्या ठिकाणी मानव आपली वस्ती बसवत आहेत, ही वस्ती बसवताना लोक ही गोष्ट विसरतात की विकास गरजेचा अत्यावश्यक आहे तशीच ही वृक्षसंपदा, निसर्ग टिकणे त्यापेक्षाही महत्त्वाची आहे


१. (१८५६) लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचा जन्म

ते एक भारतीय स्वातंत्र्यसेनानी, शिक्षक, संपादक आणि लेखक होते. ते लाल-बाल-पाल या त्रिकुटापैकी एक होते. टिळक हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे पहिले नेते होते. ब्रिटिश अधिकाऱ्यांनी त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' म्हटले. त्यांना 'लोकमान्य' ही पदवी देखील बहाल करण्यात आली

२. (१९०६) क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांचा जन्म

ते भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. त्यांना भगत सिंग यांचे गुरू मानले जाते

३. (१९२७) साली मुंबईत ’रेडिओ क्लब’ ने पहिले रेडिओ प्रसारण सुरू केले. याचेच पुढे ’आकाशवाणी’ मधे रुपांतर झाले

४. (१९४७) अभिनेते मोहन आगाशे यांचा जन्म

हे मराठा-भारतीय नाट्य व चित्रपट अभिनेते आहेत. एप्रिल, इ.स. १९९७ ते एप्रिल, इ.स. २००२ या कालखंडात हे एफ.टी.आय.आय. या संस्थेचे सर्वसाधारण संचालक होते. इ.स. १९९६ साली नवी दिल्लीच्या संगीत नाटक अकादमीने संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन यांना गौरविले

५. (१९९९) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि आंबेडकरी चळवळीचे नेते दादासाहेब रूपवते यांचे निधन

ते एक भारतीय राजकारणी, आंबेडकरवादी सामाजिक कार्यकर्ते आणि महाराष्ट्रातील वृत्तपत्राचे संपादक होते. सुरुवातीला ते शेड्यूल्ड कास्ट्स फेडरेशन आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सदस्य होते आणि नंतर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सदस्य झाले. दादासाहेब रुपवते हे मानवाधिकार नेते बाबासाहेब आंबेडकर यांचे सहकारी आणि अनुयायी होते

६. (२००४) विनोदी अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेमूद यांचे निधन

उत्तम अभिनय, उत्तम अवगत असलेली संगीत कला आणि विनोदाचा अचूक टायमिंग यामुळे अभिनेते मेहमूद यांनी दर्शकांना नेहमीच निखळ मनोरंजनचा आनंद दिला. अभिनेते, गायक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून नावारूपाला आलेले मेहमूद बॉलीवूडमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडीयन म्हणून आजही ओळखले जातात

१९५८ साली प्रदर्शित झालेल्या ‘परवरिश’ या चित्रपटामध्ये मेहमूद यांनी साकारलेल्या भूमिकेनंतर मेहमूद यांना खऱ्या अर्थाने प्रसिद्धी लाभली. त्यानंतर आलेल्या प्यासा, सीआयडी, ससुराल, गृहस्थी, लव्ह इन टोकियो, पडोसन, भूत बंगला, बॉम्बे टू गोआ या चित्रपटांना अपार लोकप्रियता लाभली. आजच्या काळामध्येही हे चित्रपट ‘एव्हरग्रीन’ म्हणून ओळखले जातात

७. (२०१२) भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या खांद्याला खांदा लावून स्त्रियांची मोठी फौज उभारणाऱ्या, आझाद हिंद सेनेतील झाशी राणी रेजिमेंटच्या कॅप्टन 'लक्ष्मी सहगल' यांचे निधन

#vishalinc5 #satara #सातारा

Comments

Popular posts from this blog

दिनविशेष २८ ऑगस्ट

दिनविशेष १४ डिसेंबर

दिनविशेष २१ ऑक्टोबर